Abhishek Bachchan Movie Bob Biswas Trailer : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनच्या (Abhishek bachchan) 'बॉब बिस्वास' (Bob Biswas) सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाच्या ट्रेलरवरून सिनेमाचा अंदाज येतो आहे. सिनेमात थ्रिलर, सस्पेन्स आणि नाट्य असणार आहे. ट्रेलरमध्ये अभिषेक बच्चनच्या अभिनयाचा अनोखा अंदाज येत आहे.
निर्मात्यांनी नुकताच 'बॉब बिस्वास' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित केला आहे. सिनेमाच्या ट्रेलरने प्रदर्शित होताच चांगलाच धुमाकुळ घातला आहे. सिनेमात प्रेक्षक शेवटपर्यंत गुंतलेली राहणार आहेत, अशी शक्यता ट्रेलरवरून येत आहे. ट्रेलरमध्ये अभिषेक बंगाली लूकमध्ये दिसतो आहे. ट्रेलरमध्ये अभिषेकचा लूक साधा दाखवला असला सिनेमात तो सीरिअल किलरच्या लूकमध्ये असणार आहे.
ट्रेलमध्ये अभिषेक आरशासमोर उभा राहून म्हणतो आहे,"तुला आठवतंय तुला बायको आहे, मुलगा आहे... मुलगीही आहे... काहीतरी आठवतंय". अभिषेकच्या या संवादावरून तो विसराळू आहे, याचा अंदाज येतो. सस्पेन्स सुरू झाल्यापासूनच सिनेमात एक-एक खून सुरू होण्यास सुरूवात होते. या सगळ्या खूनांचा कर्ता अभिषेक असतो. पण त्याच्या या विसरण्याच्या स्वभावामुळे कधी कोणाचा, कुठे, केव्हा खून केला हे त्याला आठवत नाही.
'बॉब बिस्वास' सिनेमात अभिषेकच्या पत्नीच्या भूमिकेत चित्रगंदा सिंह आहे. अभिषेकला त्याची पत्नी कोण आहे हेदेखील आठवत नाही. सिनेमाच्या ट्रेलरवरून चाहत्यांना आता सिनेमाची उत्सुकता लागली आहे. अभिषेक बच्चन आणि चित्रगंदाचा हा सिनेमा दीया घोषने दिग्दर्शित केला आहे. तर शाहरुख खानची निर्मिती संस्था रेड चिलीज या सिनेमाची निर्मिती करत आहेत.
संबंधित बातम्या
Kangana Ranaut On Farm Laws : कंगना रनौत पुन्हा बरळली, मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्याने कंगना भडकली
Sidharth Malhotra : सिद्धार्थच्या 'योद्धा' चित्रपटाची घोषणा; करण जोहरकडून धमाकेदार व्हिडीओ शेअर
Patralekhaa Mangalsutra : पत्रलेखा - राजकुमारचा एअरपोर्ट लूक; पत्रलेखाच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha