Bigg Boss 15 Updates : बिग बॉसच्या येणाऱ्या भागांत सदस्यांमधील गोंधळ दिसणार आहे. बिग बॉसच्या घरातील जोड्या तुटलेल्या दिसणार आहेत. करण कुंद्रा (Karan Kundra) आणि तेजस्वी प्रकाशच्या (Tejasswi Prakash) जोडीची चर्चा बिग बॉसच्या घरासह सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात होत असते. येणाऱ्या भागांत दोघांची जोडी तुटलेली दिसणार आहे. तेजस्वी विशालसोबत काही मुद्द्यांवर गुप्तपणे चर्चा करताना दिसत आहे. तर करण त्याचा खास मित्र उमर रियाजसोबत मनातल्या गोष्टी सांगताना दिसत आहे.
करण कुंद्रा नाराज झालेला दिसतो आहे."करण कुंद्रा त्याच्या खास मित्राला म्हणजेच उमर रियाजला सांगतो, तेजा आणि विशाल दिड तास गप्पा मारत होते. त्यांनंतर माझ्यासोबत काहीच बोलली नाही. जर तुम्ही गोष्टी लपवत असाल तर ते नात्यासाठी योग्य राहत नाही. मला खूप राग येतो आहे. पण आता काय करू कळत नाही. मला विशालचा राग येतो आहे. दोघेही खेळ खेळत आहेत. दोघांनादेखील पुढे जायचं आहे."
करण कुंद्राला उत्तर देत उमर रियाज म्हणतो,"तुम्ही जेव्हा रोज गप्पा मारता तेव्हा मनानेदेखील जोडले जात असता. त्यामुळे तुला जास्त त्रास होत आहे. त्यावर करण म्हणतो, मी पूर्णपणे फसलो गेलो आहे". करण कुंद्रा आणि तेजस्वीच्या नात्यात विशाल कोटियनमुळे दुरावा आला आहे. बिग बॉसच्या घरात सदस्यांमध्ये खूप गोंधळ दिसतो आहे. नेहा आणि तेजस्वीमध्येदेखील जोरदार भांडण झाले होते.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha