The Lady Killer Trailer Out : बॉलिवूडचा हँडसम हंक अर्थात अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आगामी 'द लेडी किलर' (The Lady Killer) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता या बहुचर्चित सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. रोमान्स ते द्वेषपर्यंत अनेक गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. 


'द लेडी किलर'चा ट्रेलर आऊट! (The Lady Killer Trailer Out)


'द लेडी किलर' या सिनेमाचा ट्रेलर 2 मिनिट 22 सेकंदाचा आहे. अर्जुन कपूरच्या एन्ट्रीने ट्रेलरची सुरुवात होते. सिनेमात अर्जुन एका नव्या शहरात राहायला गेल्याचे पाहायला मिळत आहे. या नव्या शहरात त्याला भूमी पेडणेकर भेटते. ट्रेलरमध्ये अर्जुनचा खतरनाक लूक पाहायला मिळत आहे. दुसरीकडे भूमीही अर्जुनला टक्कर देताना दिसत आहे. 'द लेडी किलर'चा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी अर्जुनच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. 


'द लेडी किलर' कधी रिलीज होणार? (The Lady Killer Release Date)


'द लेडी किलर' या सिनेमाच्या माध्यमातून अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. ट्रेलरमधील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. अर्जुनच्या करिमध्ये 'द लेडी किलर' हा सिनेमा सुपरहिट होणार असा अंदाज वर्तवला जात आहे. अजय बहलने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'ल लेडी किलर' हा सिनेमा 3 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल. सिनेमागृहात धमाका केल्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात येईल. 


अर्जुनचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. प्रेम, द्वेष, अनैतिक संबंध अशा सर्व गोष्टी 'द लेडी किलर' या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अजय बहल, पवन सोनी आणि मयंक तिवारी यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे. अर्जुन आणि भूमीसह या सिनेमात मृत्यूंजय पांडे, प्रियंका बोस आणि एसएस जहीर हे कलाकार महत्त्वाच्या भमिकेत झळकणार आहेत. 


अर्जुन कपूर व्यावसायिक कामापेक्षा अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेत्री मलायका अरोरासोबत त्याचं नाव जोडलं जातं. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीला अर्जुनने खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अर्जुन आणि मलायका यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे अनेक वेळा नेटकरी त्यांना ट्रोल करतात. अर्जुन हा मलायकापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. पण हे कपल ट्रोलर्सकडे लक्ष न देता एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. 



संबंधित बातम्या


Malaika Arora Birthday: "मी नेहमी तुझ्या पाठीशी असेन..."; मलायकाच्या वाढदिवसानिमित्त अर्जुन कपूरनं शेअर केली खास पोस्ट