The Buckingham Murders OTT Release : करीना कपूरचा सस्पेन्स थ्रिलरपट 'द बकिंगहॅम मर्डर्स' ओटीटीवर कधी होणार रिलीज? जाणून घ्या अपडेट...
The Buckingham Murders OTT Release : करीना कपूरचा आगामी चित्रपट 'द बकिंगहॅम मर्डर्स' मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला आहे.
![The Buckingham Murders OTT Release : करीना कपूरचा सस्पेन्स थ्रिलरपट 'द बकिंगहॅम मर्डर्स' ओटीटीवर कधी होणार रिलीज? जाणून घ्या अपडेट... The Buckingham Murders OTT Release: When And Where You Can Watch Kareena Kapoor's Gripping Suspense check details here The Buckingham Murders OTT Release : करीना कपूरचा सस्पेन्स थ्रिलरपट 'द बकिंगहॅम मर्डर्स' ओटीटीवर कधी होणार रिलीज? जाणून घ्या अपडेट...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/04/a1ec0ac23617f7b50e5e326f8865ee321725423659691290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
The Buckingham Murders OTT Release : करीना कपूरचा आगामी चित्रपट 'द बकिंगहॅम मर्डर्स' मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला आहे. अलीकडेच, निर्मात्यांनी चित्रपटाचा एक जबरदस्त ट्रेलर रिलीज केला होता. या ट्रेलरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. हा चित्रपट 13 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत अपडेटही समोर आली आहे.
OTT वर 'द बकिंगहॅम मर्डर्स' कधी आणि कुठे पाहता येणार?
'द बकिंगहॅम मर्डर्स' या सस्पेन्स ड्रामामध्ये करीना कपूर एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. हंसल मेहता दिग्दर्शित या चित्रपटाचे ओटीटी अधिकार एका मोठ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने आधीच घेतले आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. मात्र, हा चित्रपट ओटीटीवर कधी रिलीज होणार याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. निर्मात्यांनी अद्याप याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. विशेष म्हणजे या चित्रपटाचे अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये प्रीमियर देखील झाले आहेत.
रिलीज होण्यापूर्वीच, चित्रपटाने BFI लंडन चित्रपट महोत्सव 2023 मध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. जिओ मामी चित्रपट महोत्सव 2023 मध्ये याचे स्क्रिनिंग झाले होते.
View this post on Instagram
काय आहे 'द बकिंगहॅम मर्डर्स'ची कथा?
'द बकिंघम मर्डर्स'मध्ये करीना कपूर जसमीत भामराच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात करीना ब्रिटिश भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. त्याशिवाय या सस्पेन्स ड्रामामध्ये करीना एका दु:खी आईची भूमिका साकारत आहे जी बकिंघमशायरमधील एका लहान मुलाच्या खुन्याला शोधण्याच्या मोहिमेवर आहे.
View this post on Instagram
'द बकिंगहॅम मर्डर्स' मधील स्टारकास्ट
बकिंघम मर्डर्समध्ये करीना कपूर व्यतिरिक्त अभिनेता रणवीर ब्रार आणि कीथ ॲलन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केला आहे. बालाजी मोशन पिक्चर्स आणि महाना फिल्म्सच्या बॅनरखाली एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्यासोबत करीनाही या चित्रपटाची निर्माती आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)