The Archies : 'द आर्चीज' (The Archies) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं नवं पोस्टर नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या सिनेमात अनेक स्टार किड्स झळकणार आहेत. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
जोया अख्तरच्या 'द आर्चीज' या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखची लेक सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहे. जान्हवी कपूरची बहिण खुशी कपूर आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदादेखील या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. वेदांग रैना, मिहिर आहूजा, डॉट आणि युवराज मेंडा हे नवोदित कलाकारदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अगस्त्य हा अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा यांचा मुलगा आहे. त्याला देखील त्याचे आजोबा आणि मामा यांच्याप्रमाणे चित्रपटात काम करायचे आहे.
'द आर्चीज'च्या नव्या पोस्टरमध्ये सुहाना खान, अगस्त्य नंदा, खुशी कपूर, डॉट, वेदांग रैना, मिहिर आहूजा आणि युवराज मेंडा यांना फोकस करण्यात आलं आहे. 1960 च्या काळावर बेतलेल्या या सिनेमाच्या पोस्टरमध्ये कलाकरांचा रेट्रो लूक पाहायला मिळत आहे.
अमेरिकन कादंबरीवर बेतलेली 'द आर्चीज' (The Archies Movie Details)
'द आर्चीज' ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पण अद्याप या सीरिजची रिलीज डेट समोर आलेली नाही. ही सीरिज अमेरिकन कादंबरी 'अ आर्चीज'वर आधारित आहे. बोनी कपूर यांची लेक खुशी कपूरने 'अ आर्चीज'चं नवं पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,"आर्टीज गँगला भेटा... लवकरच येतोय नेटफ्लिक्सवर".
'द आर्चीज'चं नवं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुणांवर भाष्य करणाऱ्या या सीरिजची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. रीमा कागती या सिनेमाची निर्मिती करत आहेत. धाकट्या मुलीने, खुशी कपूरने इंडस्ट्रीत पाऊल टाकावे, अशी श्रीदेवीची नेहमीच इच्छा होती. त्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे, पण आपल्या मुलीला पडद्यावर पाहण्यासाठी त्या या जगात नाही.
संबंधित बातम्या