Sanjay Leela Bhansali Heeramandi Web Series : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची 'हीरामंडी' (Heeramandi) ही बहुचर्चित वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज रिलीज होणार आहे. या सीरिजच्या पहिल्या सीझनचं शूटिंग या महिन्याच्या शेवटापर्यंत संपेल असा अंदाज वर्तवला जात आहे. 


'हीरामंडी' या सीरिजचा पहिला सीझन आठ भागांचा असणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी या सीरिजचं पोस्टर आणि टीझर शेअर केला होता. पोस्टर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांना या सीरिजची उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून या सीरिजचं शूटिंग सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार यावर्षाच्या शेवटी ही मल्टी स्टार सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'हीरामंडी'चा दुसरा सीझन 2024 मध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला


संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेबसीरिजचे आठ भाग असणार आहेत. तर या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन लगेचच 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय लीला भन्साळी 'हीरामंडी'च्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. त्यामुळे या सीरिजकडून चाहत्यांच्या खूप अपेक्षा आहेत. 






तगडी स्टारकास्ट असलेली 'हीरामंडी' (Heeramandi Starcast)


'हीरामंडी' या सीरिजमध्ये बॉलिवूडचे अनेक लोकप्रिय चेहरे झळकणार आहेत. सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, ऋचा चड्ढा, फरीदा जलाल, मनीषा कोइराला, संजीदा शेख, फरदीन खान आणि अध्ययन सुमन हे कलाकार या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 


'हीरामंडी'चं कथानक काय आहे? (Heeramandi Web Series Story)


'हीरामंडी' या सीरिजमध्ये पाकिस्तानातील केड लाइट एरियाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. 'हीरामंडी'ला 'शाही मोहल्ला'देखील म्हटलं जातं. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली नव्हती त्यावेळी अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानातील स्त्रिया 'हीरामंडी'मध्ये स्थायिक झाल्या होत्या. 'हीरामंडी' या सीरिजमध्ये राजकारण, प्रेम आणि फसवणूक अशा अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. हिरामंडीची कथा भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर आधारित आहे. गेल्या 14 वर्षांपासून संजय लीला भन्साळी या सीरिजवर काम करत आहेत. त्यामुळे नक्कीच ही सीरिज खास असणार आहे.


संबंधित बातम्या


Sanjay Leela Bhansali : 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संजय लीला भन्साळींचा 'हीरामंडी' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला