एक्स्प्लोर
Advertisement
'छातीत नाही, खरी ताकत माणसाच्या मेंदूत असते', 'ठाकरे'त दणकेबाज संवादांची पर्वणी
हिंदीतील ट्रेलरमध्ये बेळगाव, मराठी चित्रपटांना न मिळणारे थिएटर, बाबरी मुद्दा, मुंबई दंगल, भारत-पाकिस्तान क्रिकेट यावर प्रामुख्याने भाष्य करण्यात आले आहे तर मराठी ट्रेलरमध्ये दक्षिण भारतीय लोकांचा मुद्दा, उठाव लुंगी बजाव पुंगी, एअर इंडियाच्या विरोधात केलेलं आंदोलन, मराठी पंतप्रधान यासारखे मुद्दे बेधडक शैलीत घेण्यात आलेले आहेत.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित 'ठाकरे' सिनेमाचे ट्रेलर आज रिलीज झाले. हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये हे ट्रेलर रिलीज झाले असून हिंदीच्या तुलनेत मराठीतील ट्रेलरमध्ये बेधडक संवादांनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मराठी ट्रेलरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील अप्रत्यक्ष तोफ डागली आहे. 'माणसाची छाती किती इंचाची आहे यावर माणसाची ताकत कळत नसते, खरी ताकत माणसाच्या मेंदूत असते.' अशा शब्दात मोदींवर सरळ टीका केली आहे.
'ठाकरे' सिनेमाचे दोन्ही भाषेतील ट्रेलर हे वेगवेगळे असून दोन्ही ट्रेलरमध्ये बराच फरक आहे. हिंदीतील ट्रेलरमध्ये बेळगाव, मराठी चित्रपटांना न मिळणारे थिएटर, बाबरी मुद्दा, मुंबई दंगल, भारत-पाकिस्तान क्रिकेट यावर प्रामुख्याने भाष्य करण्यात आले आहे तर मराठी ट्रेलरमध्ये दक्षिण भारतीय लोकांचा मुद्दा, उठाव लुंगी बजाव पुंगी, एअर इंडियाच्या विरोधात केलेलं आंदोलन, मराठी पंतप्रधान यासारखे मुद्दे बेधडक शैलीत घेण्यात आलेले आहेत.
मराठी चित्रपटाला थिएटर मिळण्यासंबंधी मुद्द्याचाही हिंदी ट्रेलरमध्ये समावेश केला आहे. विशेष म्हणजे हिंदी ट्रेलरमध्ये एका दृश्यात उध्दव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांचं पात्र देखील दिसत आहे.
ट्रेलर दोन्ही भाषेत रिलीज करण्यात आला असून त्यामधील दृश्य आणि संवाद वेगळे आहेत. हिंदी चित्रपटात नवाजुद्दीनचाच आवाज ठेवण्यात आला असून मराठीसाठी अभिनेते सचिन खेडेकर यांचा आवाज वापरण्यात आला आहे. हिंदीसहित मराठी ट्रेलरमध्येही दमदार संवाद ऐकायला मिळत आहेत. अभिनेता नवाजुद्दीन बाळासाहेबांची तर अमृता रावने बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची भूमिका निभावली आहे.
खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राऊत यांनीच पटकथा लिहिली असून अभिजीत पानसे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 25 जानेवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
मराठी ट्रेलरमधील महत्वाचे संवाद
- बाहेरच्या लोकांमुळे आपल्याला नोकऱ्या भेटत नाहीत
- बाहेरून येऊन आपल्यावर राज्य करतात
- दाक्षिणात्य कसे एकत्र येतात आणि आपल्या लोकांना मोठं करतात
- उठाव लुंगी बजाव पुंगी
- एअर इंडियाच्या विरोधात केलेल्या आंदोलनाचा प्रसंग
- मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत
- तुमची विमानं हवेत उडतात, ती हवा जरी तुमची असली तरी तुमच्या घरी जायचे रस्ते माझे आहेत
- सरकार के फैसले के खिलाफ अपना फैसला सुनाए, इतना कौन सा बडा तोफ है ठाकरे- मोरारजी देसाई
- माणसाची छाती किती इंचाची आहे यावर माणसाची ताकत कळत नसते, खरी ताकत माणसाच्या मेंदूत असते.
- मला नेहमी वाटते मराठी माणूस या देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे
- आप अपने देश के क्रिकेट बारे मे सोचते है, मै अपने देश मे क्रिकेट खेळनेवाले देश के बारे मे सोचता हूं
- रामलल्ला पाकिस्तान में पैदा हुए थे?
- ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल तो रंग या देशात नसेल
पाहा 'ठाकरे' चा मराठी ट्रेलर
हिंदी ट्रेलरमधील महत्वाचे संवाद
- माणसांची कामे करण्यासाठी माणसात जावं लागणार
- भीख मांगने से अच्छा है, गुंडा बनके अपना हक छिनो
- हिंदीमध्ये बेळगावच्या मुद्द्याचा समावेश
- मुंबई काय महाराष्ट्राच्या सीमेतही घुसू देणार नाही
- मैं जब भी कहता हूं 'जय हिंद-जय महाराष्ट्र'. माझ्यासाठी देश पहिला आणि राज्य नंतर
- मी चुकीचा की बरोबर हे देशातील जनता ठरवेल. मी जनतेच्या न्यायालयाला मानतो
- मुंबईतील दंगलीत तुमचा हात होता? या प्रश्नावर 'हात नाही तर पाय होता' असा संवाद
- माझा विचार लाखो लोकांमध्ये जिवंत राहील
- आपका सिक्सर याद हैं मुझे, लेकिन आपकी बॅटिंग इतनी भी अच्छी नहीं थी की मै सीमा पर शहीद हुए जवानों के परिवार के दुःख दर्द भूल जाऊ
पाहा 'ठाकरे' चा हिंदी ट्रेलर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement