Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Ankita Walawalkar : "बाई तू आंबेच विक"; पहिल्यांदाच स्टँडअप कॉमेडी करणाऱ्या 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली


Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल' (Kokan Hearted Girl) अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतचं 'कोकण सन्मान 2024' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना ती दिसून आली. अशातच आता स्टँडअप कॉमेडी करतानाचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अंकिताने आयुष्यात पहिल्यांदाच कॉमेडी शो (Stand Up Comedy) केला आहे. तिचा पहिल्या स्टँड अपचा प्रयोग फसला असून नेटकरी तिची खिल्ली उडवताना दिसून येत आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Oscar 2024 : अँड द ऑस्कर गोज टू… भारतात कधी, कुठे आणि कसं पाहू शकता 'ऑस्कर अवॉर्ड्स'; 11 मार्च रोजी होणार Live टेलिकास्ट


Oscar 2024 : अँड द ऑस्कर गोज टू… हे शब्द ऐकण्यासाठी हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत असंख्य कलाकार आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाच्या ऑस्कर (Oscar 2024) पुरस्कार सोहळ्याची भारतीयांमध्येही फार उत्सुकता आहे. 10 मार्च 2024 रोजी ऑस्कर अवॉर्डचं (96th Academy Awards) आयोजन करण्यात आलं आहे. 11 मार्च 2024 रोजी भारतीय सिनेरसिकांना या पुरस्कार सोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट पाहता येणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Parineeti Chopra Pregnant : दीपिका पदुकोणनंतर आणखी एका अभिनेत्रीकडे गुड न्यूज? सहा महिन्यांपूर्वीच बांधलीय लग्नगाठ


Parineeti Chopra : बॉलिवूडमध्ये सध्या विवाहसोहळे जोरात सुरू आहेत. तर, दुसरीकडे काही सेलेब्स आई-बाबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच दीपिका-रणवीर सिंहने (Deepika Padukone Ranveer Singh) आईबाबा होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांना दिली होती. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री गुड न्यूज देणार असल्याची चर्चा आहे. सहा महिन्यापूर्वीच या अभिनेत्रीचा विवाह झाला. सध्या या अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल होत असून ती गरोदर असल्याची चर्चा सुरू आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


OTT Release This Week : 'महाराणी 3', 'हनुमान' ते 'मेरी ख्रिसमस'; 'या' आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार 11 सिनेमे अन् धमाकेदार वेबसीरिज


OTT Release This Week : मार्च (March) महिन्याचा शेवटचा आठवडा ओटीटीप्रेमींसाठी (OTT) खूपच खास असणार आहे. या आठवड्यात नेटफ्लिक्स (Netflix) ते प्राईम व्हिडीओपर्यंत (Prime Video) वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) रिलीज होणार आहेत. या कलाकृतींची ओटीटीप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. यात 'हनुमान' (Hanuman), 'महाराणी 3' (Maharani 3) ते 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) या सिनेमांचा समावेश आहे. या आठवड्यात ओटीटीवर काय रिलीज होणार जाणून घ्या...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Asha Bhosle Meet Amit Shah : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी घेतली अमित शाह यांची भेट


Asha Bhosle Meet Amit Shah : ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. अमित शाह यांच्या हस्ते त्यांनी पुस्तकाचं उद्धाटन केलं आहे. 'बेस्ट ऑफ आशा भोसले' (Best of Asha Bhosle) असं या पुस्तकाचं नाव आहे. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान आशिष शेलारही (Ashish Shelar)  उपस्थित होते.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा