Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल' (Kokan Hearted Girl) अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतचं 'कोकण सन्मान 2024' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना ती दिसून आली. अशातच आता स्टँडअप कॉमेडी करतानाचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अंकिताने आयुष्यात पहिल्यांदाच कॉमेडी शो (Stand Up Comedy) केला आहे. तिचा पहिल्या स्टँड अपचा प्रयोग फसला असून नेटकरी तिची खिल्ली उडवताना दिसून येत आहेत.
अंकिताचा पहिलाच स्टँड-अप कॉमेडी शो फसला? (Ankita Walawalkar Stand Up Comedy Video)
स्टँड-अप कॉमेडी शो दरम्यान अंकिता वालावलकर म्हणत आहे,"काही काही कलाकारांना व्हायरल होण्यासाठी श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) बाजूला बसून पादावं लागतं. माहित असेलच तुम्हाला ... माहितीय का कोणाला? नाही माहिती..अरे फेमस आहे.. व्हिडीओ व्हायरल आहे..युट्यूबवर सर्च करा.. मी पण रिसर्च करत असताना सर्च केलं..आणि माझ्या बहिणीला तो व्हिडीओ दाखवला. बघ बाई हे खरचं आहे का? खरचं तो पादलाय का? ती म्हणाली, नाही.. कारण असे जेव्हा व्हिडीओ व्हायरल होतात तेव्हा युट्यूबवर बरेच व्हिडीओ येतात...तो आवाज त्या गोष्टीचा नव्हता..तो सोफ्याचाच आवाज होता. त्यामुळे मी म्हटलं एकदा सर्च करू आणि नंतरच बोलू.."
अंकिता पुढे म्हणते,"नंतर मी माझ्या छोट्या बहिणीला प्राजक्ताला सांगितलं... म्हटलं बघ बाई पादलाय का? ती मला म्हणाली,"नाही ताई, सोफ्याचा आवाज येतोय". त्यानंतर मी माझ्या दुसऱ्या बहिणीकडे गेले म्हटलं,"बघ गं हा पादलाय का?". ती म्हणते,"मला विचारण्यापेक्षा श्रद्धा कपूरलाच विचार ना... वास आलेला का?". अंकिताचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिचा पहिलाच स्टँड अप शो फसला असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
अंकिता वालावलकरची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
अंकिता वालावलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काल मी नैराश्यातून बाहेर आलो..आज हिचा विनोद ऐकून परत नैराश्यात जातोय, ज्या गोष्टी जमत नाही..त्या माणसाने करूच नये, तू आंबेच विक बाई तुला हे नाही जमणार, दुसऱ्यांच्या पादण्यावर रिसर्च करणारी ही बहुतेक पहिलीच असावी, माईक फेकून मारावा, अशी तुझी कॉमेडी, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
अंकिताने प्लॅनेट मराठी ओटीटीसाठी (Planet Marathi OTT) पहिला स्टँडअप कॉमेडी शो केला आहे. 'उभ्या उभ्या'... अ मराठी सेलिब्रिटी स्टँड-अप शो' असं या विनोदी कार्यक्रमाचं नाव आहे. प्लॅनेट मराठी अॅपवर प्रेक्षक विनामूल्य हा कार्यक्रम पाहू शकतात.
संबंधित बातम्या