Asha Bhosle Meet Amit Shah : ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. अमित शाह यांच्या हस्ते त्यांनी पुस्तकाचं उद्धाटन केलं आहे. 'बेस्ट ऑफ आशा भोसले' (Best of Asha Bhosle) असं या पुस्तकाचं नाव आहे. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान आशिष शेलारही (Ashish Shelar)  उपस्थित होते. 


'बेस्ट ऑफ आशा भोसले' पुस्तकाचे अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशन


'बेस्ट ऑफ आशा भोसले' या पुस्तकाचे अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशन पार पडले आहे. महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या फोटो बायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सह्याद्री अतिथी गृहावर करण्यात आले.


प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी आशाताईंच्या टिपलेल्या छायाचित्रांचे "व्हॅल्युएबल ग्रुप" आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या पुढाकाराने "बेस्ट ऑफ आशा" हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. आशा भोसले यांच्या विविध भावमुद्रा आणि वेगवेगळ्या छायाचित्रातून त्यांचे जीवन आणि गाणे या पुस्तकातून उलघडण्यात आला आहे.



सुमारे 42 विविध छायाचित्रे आणि त्या क्षणाच्या काही आठवणी यांची अत्यंत देखण्या स्वरूपात मांडणी असलेला हा एक मौल्यवान दस्तऐवजच ठरावे अशी पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.


आशा भोसले यांच्याबद्दल जाणून घ्या... (Asha Bhosle Details)


आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीत झाला. वयाच्या 10 व्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं गायलं आहे. 1946 मध्ये त्यांनी हिंदी सिनेमांसाठी गाणी गायला सुरुवात केली. हिंदी, मराठीसह त्यांनी बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन या भाषांतील गाणी गायली आहेत. 


'परदे में रहने दो', 'पिया तु अब तो आजा', 'दम मारो दम', 'ये मेरा दिल', 'दिल चीज क्या है' या आशा भोसले यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 'तरुण आहे रात्र अजुनी', 'जिवलगा राहिले रे दूर', 'ही वाट दूर जाते', 'फुलले रे क्षण माझे','एका तळ्यात होती' ही आशा भोसले यांची मराठी गाणी लोकप्रिय ठरली. आशाताईंनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये विशेष स्थानं निर्माण केलं आहे. त्यांची सदाबहार गाणी प्रेक्षक आवडीनं ऐकतात. आशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.


संबंधित बातम्या


VIDEO: आशा भोसलेंच्या नातीची सोशल मीडियावर चर्चा; बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देणारं सौंदर्य पाहून नेटकरी म्हणतात...