Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Happy Birthday Salman Khan : सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल


Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आज आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. मध्यरात्री भाईजानने जवळचे मित्र-मंडळी आणि कुटुंबियांसोबत आपला वाढदिवस मध्यरात्री साजरा केला आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच आज सकाळपासून भाईजानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तुफान गर्दी केली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Natya Sammelan : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा आज तंजावरमध्ये प्रारंभ; 100 व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर 'नाट्यकलेचा जागर'


Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) आज तंजावरमध्ये प्रारंभ होणार आहे. 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची महाराष्ट्रातील रंगकर्मी आतुरतेने वाट पाहत आहेत. 100 व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर 'नाट्यकलेचा जागर' होणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Madhuri Dixit : माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार? 


Madhuri Dixit Majha Katta : माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. माधुरीने आपल्या अभिनयासह नृत्य आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावलं आहे. माधुरी दीक्षित निर्मित 'पंचक' (Panchak) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. दरम्यान बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितने एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' (Majha Katta) या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात तिने राजकारणात एन्ट्री करणार का? याबद्दल खुलासा केला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Box Office Collection : शाहरुखचा 'डंकी' की 'प्रभास'चा 'सालार'; बॉक्स ऑफिसवर कोणाची हवा?


Dunki Salaar Box Office Collection : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. बॉक्स ऑफिसवर हे सिनेमे धमाकेदार कामगिरी करत आहेत. या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Rubina Dilaik And Abhinav Shukla : रुबिना दिलैकनं शेअर केला जुळ्या मुलींचा पहिला फोटो


Rubina Dilaik Baby: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध  अभिनेत्री  रुबिना दिलैक (Rubina Dilaik) आणि अभिनेता अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) हे आई-बाबा झाले आहेत. रुबिनानं जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. नुकतेच अभिनव आणि रुबिनाने त्यांचा जुळ्या मुलींचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करुन रुबिना आणि अभिनव यांनी त्यांच्या बाळांच्या नावांची माहिती देखील चाहत्यांना दिली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा