Dunki Salaar Box Office Collection : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. बॉक्स ऑफिसवर हे सिनेमे धमाकेदार कामगिरी करत आहेत. या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
'डंकी'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या.. (Dunki Box Office Collection)
'डंकी' हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार,'डंकी' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 29.2 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 20.12 कोटी, तिसऱ्या दिवशी 25.61 कोटी, चौथ्या दिवशी 30.7 कोटी आणि पाचव्या दिवशी 24.32 कोटींची कमाई केली आहे. तर रिलीजच्या सहाव्या दिवशी या सिनेमाने फक्त 10.25 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या सहा दिवसांत या सिनेमाने 140.20 कोटींचा गल्ला जमवला आहे.
'सालार'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या.. (Salaar Box Office Collection)
प्रभासचा 'सालार' हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 90.7 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 56.35 कोटी, तिसऱ्या दिवशी 62.5 कोटी आणि चौथ्या दिवशी 46.3 कोटींची कमाई केली. तर रिलीजच्या पाचव्या दिवशी या सिनेमाने फक्त 23.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. एकंदरीतच रिलीजच्या पाच दिवसांत या सिनेमाने 278.90 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं आहे.
'डंकी'पेक्षा बॉक्स ऑफिसवर 'सालार'चा बोलबाला
'डंकी' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त 140.20 कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे 'सालार' या सिनेमाने 278.90 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर प्रभासच्या 'सालार'चा बोलबाला पाहायला मिळत आहे. आता शाहरुख खान प्रभासचा रेकॉर्ड मोडणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'सालार' आणि 'डंकी' या दोन्ही सिनेमांची रिलीजआधीपासून चांगलीच क्रेझ होती. आता हे सिनेमे प्रदर्शित झाले असून या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही सिनेमे वेगवेगळ्या धाटणीचे आहेत. दोन्ही मोठे सुपरस्टार आहेत. दोन्ही सिनेमांचं कथानक, दिग्दर्शन, लेखन, कलाकार हे वेगळे आहेत. बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही सिनेमे धमाकेदार कामगिरी करत आहेत.
संबंधित बातम्या