Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आज आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. मध्यरात्री भाईजानने जवळचे मित्र-मंडळी आणि कुटुंबियांसोबत आपला वाढदिवस मध्यरात्री साजरा केला आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच आज सकाळपासून भाईजानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तुफान गर्दी केली आहे. 


सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. या व्हिडीओमध्ये बॅरिकेट्सदेखील दिसून येत आहेत. भाईजानचा मोठा चाहतावर्ग असून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहते गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ येत असतात. मुंबईबाहेरचे अनेक चाहतेही येत असतात. 


भाईजानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल (Salman Khan Birthday Celebration Video Viral)


सुपरस्टार सलमान खानचा बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सलमान खान एकीकडे आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. तर दुसरीकडे त्याचा भाचा आयतचादेखील आज वाढदिवस आहे. त्यामुळे माचा आणि भाचा यांनी एकत्र येत आपला वाढदिवस साजरा केला आहे. अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांच्या चेहऱ्यावर सेलिब्रेशनचा आनंद स्पष्ट दिसत आहे. सोशल मीडियावर केक कटिंग सेरेमनीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.






सलमानच्या वाढदिवसाला अरबाज खान त्याचा मुलगा अरहान खान, यूलिया वंतूर, हेलेन, अलवीरा खान अग्निहोत्री आणि बॉबी देओलसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. छोटा आयतदेखील केक कट करताना खूप आनंदी दिसून आला. सोशल मीडियावर सध्या हॅश टॅग सलमान खान ट्रेंड करत आहे. सलमान खान आज आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा करू शकतो. 






सलमान खानबद्दल जाणून घ्या...


भाईजान, दबंग खान, यारों का यार, सल्लू, चुलबूल पांडे अशा अनेक नावांनी सलमान खान ओळखला जातो. अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त  शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.   सलमान सध्या 'बिग बॉस' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. सलमान खानने 1988 साली बीवी हो तो ऐसी या हिंदी चित्रपटातील छोटेखानी भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले .1989 साली सलमानाने प्रमुख नायकाची भूमिका साकारलेल्या मैने प्यार किया या हिंदी चित्रपटाने प्रचंड व्यावसायिक यश कमवले आणि त्याच्या करिअरला कलाटणी मिळाली. 


संबंधित बातम्या


VIDEO: भावाच्या दुसऱ्या लग्नात भाईजानचा जबरदस्त डान्स; 'दिल दियां गल्लां'वर वहिनीसोबत थिरकला सलमान