Rubina Dilaik Baby: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध  अभिनेत्री  रुबिना दिलैक (Rubina Dilaik) आणि अभिनेता अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) हे आई-बाबा झाले आहेत. रुबिनानं जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. नुकतेच अभिनव आणि रुबिनाने त्यांचा जुळ्या मुलींचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करुन रुबिना आणि अभिनव यांनी त्यांच्या बाळांच्या नावांची माहिती देखील चाहत्यांना दिली आहे.


रुबिना आणि अभिनवनं शेअर केला फोटो 


रुबिनाने सप्टेंबरमध्ये तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. रुबिनाने एक महिन्यापूर्वी जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. रुबिना आणि अभिनव यांनी त्यांच्या मुलींचा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.  या फोटोमध्ये रुबिना आणि अभिनव हे त्यांच्या मुलींना घेऊन बाल्कनीमध्ये उभे आहेत, असं दिसत आहे.  


रुबिना आणि अभिनव यांच्या मुलींची नावं


जुळ्या मुलींसोबतचे फोटो शेअर करुन रुबिना आणि अभिनव यांनी त्यांच्या बाळांच्या नावांची माहिती देखील चाहत्यांना दिली आहे. रुबिना आणि अभिनव यांनी फोटोला कॅप्शन दिलं, "आमच्या मुली, जीवा आणि ईधा आज एक महिन्याच्या झाल्या आहे.त हे सांगताना खूप आनंद  होत आहे. गुरुपूरबच्या शुभ दिवशी ब्रह्मांडाने आम्हाला आशीर्वाद दिला!"रुबिना आणि अभिनव यांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ते दोघे पूजा करताना दिसत आहेत.






रुबिनानं 'या' मालिकांमध्ये केलं काम


रुबिना दिलैकने अभिनव शुक्लासोबत जून 2018 मध्ये लग्न केले. त्यानंतर अभिनव आणि रुबिना यांनी बिग बॉस-14 (Bigg Boss 14) मध्ये सहभाग घेतला.  रुबिना ही बिग बॉस-14 या कार्यक्रमाची विजेती ठरली.  रूबिनानं छोटी बहू, जनी और जुजु आणि शक्ती या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच तिनं खतरों के खिलाडी या कार्यक्रमात देखील सहभाग घेतला होता.






इतर महत्वाच्या बातम्या:


PHOTO : ‘छोटी बहू’ रुबिका दिलैकची पतीसोबत गोव्यात धमाल, सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणतेय...