Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Rashmika Mandanna Vijay Deverakonda : रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडाचा 'या' महिन्यात होणार सारखपुडा; लवकरच अडकणार लग्नबंधनात


Rashmika Mandanna Vijay Deverakonda Engaged : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असून लवकरच त्यांचा साखरपुडा होणार आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Ira Khan Nupur Shikhare Wedding : आयरा-नुपूरच्या लग्नसोहळ्याला सुरुवात! मेहंदी ते संगीत,'असा' असेल आमिरच्या लेकीचा शाही थाट; जाणून घ्या सर्वकाही


Ira Khan Nupur Shikhare Wedding Details : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) आणि नुपूर शिखरे (Nupur Shikhare) पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज आहेत. 3 जानेवारी 2024 रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर आता त्यांचा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. आजपासून आयरा-नुपूरच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Annapoorani : "राम मांसाहारी होता" दाक्षिणात्य सिनेमातील संवादावरुन नवा वाद; नयनतारासह निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल


Annapoorani : हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेत्री नयनतारासह (Nayanthara) अन्नपूर्णी (Annapoorani)  या सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीये. माजी शिवसेना नेते रमेश सोळंकी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. "राम मांसाहारी होता" असा संवाद या सिनेमामध्ये घेण्यात आलाय. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असून मी हिंदू विरोधी लोकांविरोधात (Anti-Hindu) आणि हिंदू विरोधी नेटफ्लिक्स विरोधात तक्रार दाखल केली असल्याचे रमेश सोळंकी म्हणाले आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Urfi Javed Propose Munawar Faruqui : "गर्लफ्रेंडला सोड अन् माझ्याकडे ये", उर्फी जावेदचं मुन्नवर फारुकीला प्रपोजल!


Urfi Javed Propose Munawar Faruqui : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम आणि त्यातील स्पर्धक विविध कारणांनी चर्चेत आहेत. 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) फेम विनोदवीर मुन्नवर फारुकीला (Munawar Faruqui) उर्फी जावेदने (Urfi Javed) थेट प्रपोज केलं आहे. गर्लफ्रेंडला सोड आणि माझ्याकडे ये, असं उर्फी त्याला म्हणाली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Salman Khan : सलमान खानच्या फार्महाऊसमध्ये दोन अज्ञात व्यक्तींचा घुसण्याचा प्रयत्न; पोलीसांचा तपास सुरू


Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) पनवेल (Panvel) येथील फार्महाऊसमध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी घुसण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या पनवेल पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. सुरक्षा रक्षकांना संशय आल्यानंतर लगेचच त्यांनी पोलीसांना बोलावून अज्ञान व्यक्तींना त्यांच्या ताब्यात दिलं आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा