Rashmika Mandanna Vijay Deverakonda Engaged : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असून लवकरच त्यांचा साखरपुडा होणार आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 


रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा वैयक्तिक आयुष्यासह व्यावसायिक कामामुळेदेखील चर्चेत असतात. रिपोर्टनुसार, विजय देवरकोंडा अभिनेत्री रश्मिका मंदानाला डेट करत आहे. अद्याप दोघांनीही त्यांच्या रिलेशनबद्दल अधिकृतरित्या भाष्य केलेलं नाही. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. 


'या' कारणाने रश्मिकाच्या 


मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचा लवकरच साखरपुडा होणार आहे. ट्वीटरवर एका चाहत्याने कमेंट केली आहे की, तू आमची नॅशनल क्रश आहे. तुझ्यासारखी पत्नी मला मिळेल, अशी आशा आहे". या ट्वीटवर प्रतिक्रिया देत रश्मिकाने लिहिलं आहे,"ओह... मी जेव्हा लग्नाचा विचार करेल तेव्हा माझा पतीदेखील असाच विचार करणारा असावा". 


विजय अन् रश्मिकाची लव्हस्टोरी (Vijay Deverakonda Rashmika Mandanna Love Story)


'गीता गोविंदम' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान विजय आणि रश्मिकाची पहिली भेट झाली होती. प्रत्येक सण दोघे एकत्र साजरा करतात. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात रश्मिका आणि विजयचा साखरपुडा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 






रश्मिका मंदानाचा 'पुष्पा 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रेम्बो' या तेलुगू सिनेमाचाही ती भाग असणार आहे. विजयचा 'खुशी' हा सिनेमा या आधी प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 


विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाची जोडी ऑन स्क्रीन हिट


विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाची ऑनस्क्रीन जोडीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ही लोकप्रिय जोडी आहे. 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉमरेड' हे त्यांचे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या दोन्ही सिनेमांतील त्यांचं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. अनेकदा ते एकत्र स्पॉट झाले आहेत.  त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. 


संबंधित बातम्या


Vijay Deverakonda Rashmika Mandanna : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना अडकणार लग्नबंधनात? 'त्या' व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण