Annapoorani : हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेत्री नयनतारासह (Nayanthara) अन्नपूर्णी (Annapoorani या सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीये. माजी शिवसेना नेते रमेश सोळंकी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. "राम मांसाहारी होता" असा संवाद या सिनेमामध्ये घेण्यात आलाय. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असून मी हिंदू विरोधी लोकांविरोधात (Anti-Hindu) आणि हिंदू विरोधी नेटफ्लिक्स विरोधात तक्रार दाखल केली असल्याचे रमेश सोळंकी म्हणाले आहेत. 


राम सोळंकी (Ramesh Solanki) म्हणाले, 'अन्‍नपूर्णी' या सिनेमा रामाचा अपमान केला आहे. हा सिनेमा हिंदू विरोधी  आहे, असे म्हणत सिनेमातील वादग्रस्त दृश्यांवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. या मध्ये "राम देखील मांसाहारी होता", असे सांगण्यात आले आहे. लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यासाठी असे सीन सिनेमांमध्ये घेतले जात आहेत, असा दावा सोळंकी यांनी केलाय. त्यांनी महाराष्ट्र पोलीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे सिनेमाचे निर्माते आणि नेटफ्लिक्सवर (Netflix) कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय, त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवावी, असे देखील सोळंकी म्हणाले. 


सिनेमात काय दाखवण्यात आले आहे? 


रमेश सोळंकी (Ramesh Solanki) यांनी सिनेमातील संवाद आणि काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. "एकीकडे सर्वजण राम मंदिराच्या उद्घाटनची आणि मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची आतुरतेने वाट पाहात असताना हिंदू विरोधी सिनेमे प्रदर्शित केले जात आहेत", असे सोळंकी म्हणाले आहेत. या सिनेमात अभनेता फरहान 'श्रीराम देखील मांसहार करत होते', असे सांगून मांसाहार करण्यास प्रवृत्त करतो. या सिनेमात अभिनेत्रीचे वडिल देवाला नैवैद्य दाखवण्यासाठी प्रसाद बनवताना दाखवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे त्यांची मुलगी मटण शिजवताना दाखवण्यात आली आहे. याशिवाय ती नमाज पढतानाही दाखवण्यात आली आहे. 


नयनतारासह निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल


रमेश सोळंकी (Ramesh Solanki) याबाबत बोलताना म्हणाले, संपूर्ण जग सध्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी उत्सुक आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. हा या युगातील सर्वांत मोठा समारंभ असेल. मात्र, त्याच्या काही दिवस अगोदरच काही लोक अभद्र टीप्पणी करताना दिसत आहेत. लव जिहाद दाखवणे, पुजाऱ्याच्या मुलीला मांसाहार करण्यास सांगणे, अशा पद्धतीचे दृश्य जाणीवपूर्वक दाखवली जात आहेत. सोळंकी यांनी या प्रकरणी निर्मात्यांसह कलाकारांविरोधात तक्रार दिली आहे. दिग्दर्शक निलेश कृषणा, अभिनेत्री नयनतारा, निर्माते जतीन सेठी, आर रवीद्र, पुनीत गोयंका, नेटफ्लिक्स इंडिया यांचा तक्रारीत उल्लेख करण्यात आलाय.  


इतर महत्वाच्या बातम्या 


Ira Khan Nupur Shikhare Wedding : आयरा-नुपूरच्या लग्नसोहळ्याला सुरुवात! मेहंदी ते संगीत,'असा' असेल आमिरच्या लेकीचा शाही थाट; जाणून घ्या सर्वकाही