Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) पनवेल (Panvel) येथील फार्महाऊसमध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी घुसण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या पनवेल पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. सुरक्षा रक्षकांना संशय आल्यानंतर लगेचच त्यांनी पोलीसांना बोलावून अज्ञान व्यक्तींना त्यांच्या ताब्यात दिलं आहे.


अभिनेता सलमान खानच्या पनवेल मधील फार्महाऊसमध्ये बेकायदा घुसण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फार्महाऊस च्या तारा तोडून आतमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन तरुणांना सुरक्षारक्षकांनी पकडून पनवेल पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या दोघांकडे बनावट आधार कार्ड सापडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.


नेमकं प्रकरण काय?


अजेशकुमार ओमप्रकाश गिल आणि गुरुसेवकसिंह तेजासिंह सीख नामक तरुणांनी सलमान खानच्या पनवेल मधील फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे.  4 जानेवारीला सायंकाळी 4 वाजता वाजे गाव येथील अभिनेता सलमान खान याच्या अर्पिता फार्महाऊसमध्ये तारा आणि झाडांच्या कम्पाऊंडमधून घुसण्याचा या दोघांनी प्रयत्न केला होता. सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडले असता त्यांनी आपली खोटी नावे सांगितली. मात्र सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी पनवेल पोलीस अधिक तपास करत आहेत.


सलमानच्या फार्महाऊसमध्ये दोन जणांचा घुसण्याचा प्रयत्न 


सलमान खानचं पनवेलला मोठं फार्महाऊस आहे. अनेकदा भाईजान या फार्महाऊसमध्ये येत असतो. याच फार्महाऊसमध्ये आता तो अज्ञान व्यक्तींनी घुसण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन्ही तरुणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. 


150 एकरात पसरलेलं आहे सलमान खानचं पनवेल फार्म हाऊस


सलमान खानचं पनवेल येथील फार्महाऊस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर सलमानचं फार्महाऊस आहे. हे फार्महाऊस भाईजानची बहीण अर्पिताच्या नावावर आहे. हे आलिशान फार्महाऊस 150 एकरमध्ये पसरलं आहे. ज्यामध्ये जिम, स्विमिंग पूल आणि फॉर्मिंगची सर्व व्यवस्था आहे. या फार्महाऊसमध्ये शेती करतानाचे फोटो सलमानने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केले होते. यात घोडेस्वारीसाठीदेखील जागा राखून ठेवली आहे. कोरोनाकाळात सलमान खान याच फार्महाऊसमध्ये होता.  


सलमान खानचा 'टायगर 3' (Tiger) हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. प्राईम व्हिडीओवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. या सिनेमानंतर तो द बुल या सिनेमात दिसणार आहे.  तसेच कबीर खानच्या बब्बर शेर या सिनेमातही तो झळकेल.


संबंधित बातम्या


Salman Khan : 'टायगर'नंतर बब्बर शेरच्या भूमिकेत दिसणार सलमान खान; कबीर खानने दिली सिनेमाची ऑफर