Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


JNU Movie Official Teaser : देशविरोधी घोषणा, जय श्रीरामचा जयघोष, PM मोदींचे होर्डिंग, डाव्यांवर निशाणा; 'जेएनयू' चित्रपटाचा टीझर लाँच


JNU Movie Official Teaser : देशविरोधी घोषणा, जय श्रीरामचा जयघोष, पंतप्रधान मोदींचे होर्डिंग, डाव्यांवर निशाणा साधणारा जेएनयू चित्रपटाचा टीझर लाँच (JNU movie Official Teaser launch) करण्यात आला आहे. विद्यापीठात शिक्षणाच्या आडून देश तोडण्याच्या कारवाया सुरू आहेत का असा प्रश्न विचारत काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले होते. त्यानंतर आज टीझर लाँच करण्यात आला. यामध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादग्रस्त घटनादेखील दाखवण्यात आल्या आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


OTT Release This Week : हृतिकचा 'Fighter' ते 'ऐ वतन मेरे वतन'; मार्च महिन्याच्या 'या' आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी


OTT Release This Week : ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्यात सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रदर्शित होत असतात. मार्च महिन्याचा हा आठवडा ओटीटी प्रेमींसाठी खूपच खास असणार आहे. या आठवड्यात अनेक दर्जेदार सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रदर्शित होणार आहेत. प्रेक्षकांना 18 ते 24 मार्च दरम्यान ओटीटीवर अनेक चांगल्या कलाकृती पाहायला मिळणार आहेत. सिनेमागृहात धमाका केलेल्या सिनेमांसह अनेक नवे सिनेमेदेखील या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होतील.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Aishwarya Pregnant : ऐश्वर्या प्रेग्नंट? लवकरच चाहत्यांना देणार गुड न्यूज


Aishwarya Pregnant : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) फेम ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट (Neil Bhatt) यांची जोडी छोट्या पडद्यावर खूपच लोकप्रिय आहे. दोघांना एकत्र पाहायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. ऐश्वर्या सध्या चर्चेत आहे. 'डान्स दिवाने' (Dance Deewane) या कार्यक्रमाच्या सेटवर ती बेशुद्ध पडली होती. शुद्धीवर आपल्यानंतर अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आपल्या प्रकृतीसंदर्भात माहिती दिली. पण आता ऐश्वर्या प्रेग्नंट (Aishwarya Pregnant) असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. ऐश्वर्या आणि नील लवकरच चाहत्यांना गुड न्यूज देतील असे म्हटले जात आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Mirzapur Season 3 Teaser :  'गुड्डू भैय्या झिंदाबाद'! आज रिलीज होणार 'मिर्झापूर-3' चा टीझर?


Mirzapur Season 3 Teaser :  ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालणारी बहुप्रतिक्षीत 'मिर्झापूर-3' चा टीझर आज लाँच होणार आहे. मिर्झापूरचा या वेबसीरिजचा दुसरा सीझन 2020 मध्ये लाँच झाला होता. प्रेक्षकांनी या सीझनला तुफान प्रतिसाद दिला होता. आता तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून मिर्झापूर-3 ची चर्चा रंगली होती. अखेर ही प्रतिक्षा आता संपुष्टात येणार आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Sameer Wankhede : "मी मोदी, शाहांना मानतो, बॉलिवूड स्टार्स माझ्यासाठी सेलिब्रिटी नाहीत"; आर्यन खान प्रकरणामुळे चर्चेत आलेले समीर वानखेडे स्पष्टच म्हणाले


Sameer Wankhede : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शाह (Amit Shah) यांना मी मानतो. तसेच ते खऱ्या अर्थाने सेलिब्रिटी आहेत. बॉलिवूड स्टार्स सेलिब्रिटी माझ्यासाठी सेलिब्रिटी नाहीत, असं वक्तव्य आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे (Aaryan Khan Drugs Case) चर्चेत आलेल्या समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी केलं आहे.रोखठोक, बेधडक आणि कर्तव्यदक्ष असे सरकारी अधिकारी अशी समीर वानखेडे यांची ओळख आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा