Neha Dhupia : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपियाने (Neha Dhupia) गॉडफादर नसतानाही इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध केलं आहे. आज बॉलिवूडच्या आघाडीच्या यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत नेहाचा समावेश होता. नुकत्याच एका मुलाखतीत तिने प्रेग्नंसीदरम्यान आलेल्या अडचणी आणि इंडस्ट्रीतील कटू सत्यावर भाष्य केलं आहे.


झूमला दिलेल्या मुलाखतीत नेहा धूपिया म्हणाली,"मी मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं तेव्हा अभिनेत्री फिट असणं गरजेचं होतं. जर फिगर परफेक्ट नसेल तर तुम्हाला कास्ट केलं जात नव्हतं. मी प्रेग्नंट असताना निर्मात्यांनी मला बाहेरचा रस्ता दाखवला होता".


नेहा धुपिया म्हणाली,"मी प्रेग्नंट असताना मला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. शूट झाल्यानंतर पुढील आठ महिने काहीही माहिती समोर आली नाही. त्यावेळी मी निर्मात्यांना सांगितलं होतं की,मी प्रेग्नंट आहे आणि पुढील काही महिने मी काम करू शकत नाही. त्यानंतर लगेचच निर्मात्यांनी मला सांगितलं की, आपण आता या सिनेमासाठी काम करू शकत नाही. 


नेहा पुढे म्हणाली,"वजन जास्त असल्यामुळे अनेक प्रोजेक्टचा भाग मला होता आलेलं नाही. जाड असल्याने अनेकांनी सुनावलं. शार्प फेस कट असल्याने मला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला. एका निर्मात्यांनी मला 7 ते 8 किलो वजन कमी करायला लावलं. आजही महिला कलाकारांसाठी इंडस्ट्रीमध्ये स्टीरियोइप आहे. नेहा धूपिया 'सेलिब्रिटी टॉक शो' होस्ट करताना दिसते. लवकरच 'थेरेपी थेरापी'च्या माध्यमातून ती ओटीटीवर पदार्पण करणार आहे. 






नेहा धुपिया लग्नाआधीच होती प्रेग्नंट!


नेहा धुपिया आणि अंगद बेदी 10 मे 2018 रोजी दिल्लीतील एका गुरुद्वारामध्ये गुपचूप लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाबद्दल सिनेसृष्टीतील कोणालाच माहिती नव्हतं. लग्नानंतर त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. नेहा धुपिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती. याबदद्ल तिने घरी सांगितल्यानंतर आई-वडिलांनी पुढील 72 तासांत नेहा आणि अंगद यांना लग्न करायला सांगितलं.  


नेहाच्या आईला आवडायचा अंगद


बॉलिवूड बबलच्या वृत्तानुसार, नेहा धुपियाने अंगद बेदीला तिची आई मनपिंदर बबली धुपिया यांना भेटवलं होतं. पहिल्या भेटीतच नेहाच्या आईला अंगद जावई म्हणून आवडला  होता. त्यावेळी आईने अंगदला माझी साथ न सोडण्याचा सल्ला दिला होता.


संबंधित बातम्या


Angad Bedi Post: "त्यांनी कित्येक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे"; बिशनसिंह बेदी यांच्या निधनानंतर अंगद बेदीनं शेअर केली भावनिक पोस्ट