Mirzapur Season 3 Teaser :  ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालणारी बहुप्रतिक्षीत 'मिर्झापूर-3' चा टीझर आज लाँच होणार आहे. मिर्झापूरचा या वेबसीरिजचा दुसरा सीझन 2020 मध्ये लाँच झाला होता. प्रेक्षकांनी या सीझनला तुफान प्रतिसाद दिला होता. आता तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून मिर्झापूर-3 ची चर्चा रंगली होती. अखेर ही प्रतिक्षा आता संपुष्टात येणार आहे. 


'मिर्झापूर 3' ची घोषणा झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. गुड्डू भैय्या आणि कालीन भैय्या यांच्यातील संघर्षाचा नवा अंक पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. आज 'मिर्झापूर 3' चा टीझर लाँच झाल्यानंतर आजच वेबसीरिजची रिलीज डेट आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. 


अली फजलचा व्हिडीओ चर्चेत


गुड्डू भैय्याची व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता अली फजल याचा व्हिडीओ चर्चेत आला. सोमवारी, त्याने एका व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या पोस्टद्वारे अलीने 'मिर्झापूर 3'शी संबंधित काही खास घोषणा करण्याचे संकेत दिले होते. व्हिडिओमध्ये, अली आरशात पाहत स्क्रिप्ट वाचतो आणि म्हणतो, 'सुरुवातीला मी नाईलाजाने हे काम केले. पण, आता हे काम करण्यास आनंद वाट आहे. आता पुढे आणखी मज्जा येणार आहे. 19 मार्च रोजी सगळं काही होणार आहे, असे अली फजलने आपल्या व्हिडीओत म्हटले. 


 




'मिर्झापूर सीझन 3' ची स्टारकास्ट 


'मिर्झापूर सीझन 3' मध्ये पंकज त्रिपाठी, दिव्येंदू शर्मा, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल, ईशा तलवार आदींच्या मुख्य भूमिका आहेत