Aishwarya Pregnant : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) फेम ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट (Neil Bhatt) यांची जोडी छोट्या पडद्यावर खूपच लोकप्रिय आहे. दोघांना एकत्र पाहायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. ऐश्वर्या सध्या चर्चेत आहे. 'डान्स दिवाने' (Dance Deewane) या कार्यक्रमाच्या सेटवर ती बेशुद्ध पडली होती. शुद्धीवर आपल्यानंतर अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आपल्या प्रकृतीसंदर्भात माहिती दिली. पण आता ऐश्वर्या प्रेग्नंट (Aishwarya Pregnant) असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. ऐश्वर्या आणि नील लवकरच चाहत्यांना गुड न्यूज देतील असे म्हटले जात आहे.
ऐश्वर्या देणार गुड न्यूज (Aishwarya Good News)
ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट लवकरच आई-बाबा होणार आहेत. अद्याप दोघांनीही चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिलेली नाही. चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर करण्यासाठी ऐश्वर्या आणि नील एका चांगल्या संधीची वाट पाहत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांतच ऐश्वर्या-नील चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर करतील.
ऐश्वर्या सेटवरच पडलेली बेशुद्ध
ऐश्वर्या होळी स्पेशल शूट करत असताना सेटवरच बेशुद्ध पडली होती. त्यानंतर चाहते चिंता व्यक्त करत होते. त्यामुळे शुद्धीवर आल्यानंतर ऐश्वर्याने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आपल्या प्रकृतीसंदर्भात माहिती दिली. ऐश्वर्याने लिहिलं होतं,"सर्वांना नमस्कार, सर्वात आधी सादरीकरणादरम्यान जे काही झालं तेव्हा मला दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी खूप-खूप धन्यवाद. आता माझी प्रकृती स्थिर आहे. तुमचं प्रेम, पाठिंबा आणि समर्थन मला पुढे मला सकारात्मक दृष्टिकोण देतं".
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या आणि नील भट्ट आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. ऐश्वर्या आणि नील दोघेही सध्या खूप आनंदी आहेत. काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या (Salman Khan) 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या कार्यक्रमात ते दिसून आले होते. आता त्यांच्या आगामी कार्यक्रमांचीदेखील चाहत्यांना उत्सुकता आहे.
'अशी' सुरू झाली ऐश्वर्या अन् नीलची लव्हस्टोरी (Aishwarya Sharma Neil Bhatt Love Story)
ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांची पहिली भेट 'गुम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) या मालिकेच्या सेटवर झाली. या मालिकेत दोघेही मुख्य भूमिकेत होते. मालिकेदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ऐश्वर्या आणि नील 20 नोव्हेंबर 2021 रोजी लग्नबंधनात अडकले. दोघांना आता नव्या प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेच्या माध्यमातून ऐश्वर्या आणि नील घराघरांत पोहोचले. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर होती. ऐश्वर्या रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमातही सहभागी झाली होती.
संबंधित बातम्या