Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Kiran Mane : "उभा महाराष्ट्र सांगतोय रं, कुणाची हाय शिवसेना"; किरण मानेंनी कवितेतून मांडला हुंकार


Kiran Mane : अभिनेते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते किरण माने (Kiran Mane) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता नुकतचं शिवसेनेच्या एका कार्यक्रमात त्यांनी "एकाच ताटात जेवून खाऊन भावाला लावलाय चुना", हे गाणं (Kiran Mane Song) गायलं आहे. त्यांचा गाणं गातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Heeramandi First Look Out : भव्यदिव्य सेट, डोळे दिपवणारे दृष्ये, शाही थाट अन् बरचं काही; संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी'चा फर्स्ट लूक आऊट!


Heeramandi First Look Out : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) हे बॉलिवूडचे लोकप्रिय सिने-दिग्दर्शक आहेत. त्यांच्या बिग बजेट सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता असते. आता 'हीरामंडी' (Heeramandi) या सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी ते सज्ज आहेत. या सीरिजची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अशातच निर्मात्यांनी या बहुचर्चित सीरिजचा फर्स्ट लूक आऊट केला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Prabhas : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास सिनेसृष्टीतून ब्रेक घेणार? कारण आलं समोर


Prabhas : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. बॉक्स ऑफिसवर त्याचे सिनेमे धुमाकूळ घालतात. पण आता अभिनेता सिनेसृष्टीतून ब्रेक घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Shivani Surve Ajinkya Nanaware Engagement : शिवानी सुर्वे - अजिंक्य ननावरे यांनी गुपचूप उरकला साखरपुडा; फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज


Shivani Surve Ajinkya Nanaware Engagement : मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) आणि अभिनेता अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware) यांनी गुपचूप साखरपुडा उरकला आहे. फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. त्यांचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Ankita Lokhande : 'बिग बॉस'ची ट्रॉफी हुकली, पण मिळाला मोठा सिनेमा; 'या' अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार अंकिता लोखंडे!


Ankita Lokhande New Project : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक सध्या चर्चेत आहेत. 'बिग बॉस 17'च्या (Bigg Boss 17) ट्रॉफीवर अंकिता लोखंडेचं नाव कोरलं गेलं नसलं तरी अभिनेत्रीला आता एक सिनेमा मिळाला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा