Sara Ali Khan and Ananya Panday Movie : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) आपल्या मैत्रीमुळे कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतात. अनन्या आणि सारा 2023 मध्ये करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) या चॅट शोमध्ये दिसल्या होत्या. पण आता 'कॉकटेल 2' (Cocktail 2) या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच त्या स्क्रीन शेअर करताना दिसतील.


'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात अनन्या पांडे आणि सारा अली खानने अनेक खुलासे केले होते. आता या आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रींसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अनन्या आणि सारा पहिल्यांदाच एका सिनेमात काम करणार आहेत. 


अनन्या-साराच्या आगामी सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता


अनन्या पांडे आणि सारा अली खान यांच्या मैत्रीची नेहमीच चर्चा होत असते. पण आता त्यांची ही मैत्री प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. अनन्या आणि साराला मैडॉक फिल्म्सच्या ऑफिसबाहेर स्पॉट करण्यात आलं आहे. त्यामुळे त्या दोघी 'कॉकटेल 2'चा भाग असणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सारा अली खान आणि अनन्या पांडे पहिल्यांदाच एका सिनेमात झळकणार आहेत. 'कॉकटेल 2'संदर्भात अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 






'कॉकटेल' कधी रिलीज झालेला? (Cocktail Release Date)


'कॉकटेल' हा सिनेमा 2012 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात सैफ अली खान, दीपिका पादुकोण, डायना पेंटीसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. दीपिका पादुकोण आणि सैफ अली खानचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता 'कॉकटेल 2'मध्ये अनन्या पांडे आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. चाहते त्यांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 


अनन्या-साराच्या कलाकृतींबद्दल जाणून घ्या..


अनन्या पांडेने करण जोहरच्या (Karan Johar) 'स्टूडंट ऑफ द इयर 2' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. 'पती पत्नी और वो', 'खाली पीली', 'गहराइयां', 'लायगर' आणि 'ड्रीम गर्ल 2' या सिनेमांत ती दिसून आली आहे. नुकताच तिचा 'खो गए हम कहां' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. दुसरीकडे सारा अली खानने 2018 मध्ये केदारनाथ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. केदारनाथसह सिम्बा, कूली नं 1 अशा अनेक सिनेमांचा ती भाग आहे. अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Koffee With Karan 8: "सारानं कोणाला डेट करावं?"; करण जोहरचा प्रश्न, अनन्या उत्तर देत म्हणाली, "तिनं आता..."