Prabhas : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. बॉक्स ऑफिसवर त्याचे सिनेमे धुमाकूळ घालतात. पण आता अभिनेता सिनेसृष्टीतून ब्रेक घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.
'सालार'च्या (Salaar) यशानंतर प्रभास 'राजा साब' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केल्यानंतर सुपरस्टार सिनेसृष्टीतून ब्रेक घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्याची प्रकृती हे याचं कारण ठरलं आहे. प्रभासला गेल्या काही दिवसांपासून गुडघेदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी तो परदेशात जाणार आहे. एकंदरीतच प्रकृतीच्या कारणाने प्रभास सिनेसृष्टीतून ब्रेक घेणार आहे.
प्रभासच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या.. (Prabhas Upcoming Movies)
प्रभासचा 'सालार' (Salaar) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रशांत नील दिग्दर्शित या सिनेमात पृथ्वीराज सुकुमारन, श्रृती हासन, जगपती बाबू, माइप गोपी, श्रिया रेड्डी आणि बॉबी सिम्हा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासह तो 'कल्कि 2898 एडी'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 9 मे 2024 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल. संदीप रेड्डी वांगाच्या आगामी स्पिरिट या सिनेमाचाही तो भाग आहे.
कोण आहे प्रभास? (Who is Prabhas)
तेुलगू सुपरस्टार प्रभासने आजवर अनेक सिनेमांत काम केलं आहे. मिस्टर परफेक्ट, मिर्ची, बाहुबली या हिंदी सिनेमांचाही तो भाग आहे. त्याच्या बाहुबली 2 या सिनेमाने सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. अभिनेत्याचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. प्रभासच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
प्रभासचा जन्म 1979 मध्ये मद्रास (तमिळनाडु) येथे झाला. प्रभासचं खरं नाव वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पालापाटि आहे. अनेकांना त्याचे हे नाव माहित नाही. प्रभास त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. प्रभासने त्याच्या अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरूवात दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून केली आहे. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ईश्वर’ या चित्रपटामधून प्रभासने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सध्या तो बॉलिवूडदेखील गाजवत आहे.
संबंधित बातम्या