Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Kedar Shinde Aaipan Bhari Deva : केदार शिंदे सांगणार प्रत्येक घरातल्या आईपणाची गोष्ट; ‘आईपण भारी देवा’ चित्रपटाची घोषणा
Kedar Shinde Aaipan Bhari Deva : महिलांच्या भावविश्वाची गोष्ट रुपेरी पडद्यावर सांगितल्यानंतर आता दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत केदार शिंदे यांनी 'आईपण भारी देवा' (Aaipan Bhari Deva) या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात केदार शिंदे आईचे भावविश्व मांडणार असल्याचे म्हटले जात आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Shatrughan Sinha : शत्रुघ्न सिन्हा करणार ओटीटीवर पदार्पण, सनी लिओनीसोबत झळकणार
Shatrughan Sinha : बॉलिवूडचे शॉर्टगन अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) आता नवीन इनिंग खेळण्यास सज्ज झाले आहेत. शत्रुघ्न सिन्हा पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात उतरणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवणार आहेत. वेब सीरिज गँग्ज ऑफ गाझियाबाद या मालिकेतून ते ओटीटीवर झळकणार आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Dolly Sohi Death : आधी बहिणीनं जग सोडलं, त्यापाठोपाठ 'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्रीनंही शेवटचा श्वास घेतला; टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा
Dolly Sohi Death : 'कुमकुम भाग्य' आणि 'देवो के देव महादेव' यांसारख्या टीव्ही शोमधून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री डॉली सोही (Dolly Sohi Death) हिचे निधन झाले आहे. मागील काही महिन्यांपासून तिची कर्करोगाशी झुंज सुरू होती. मात्र, ही झुंज अपयशी ठरली. डॉलीच्या निधनाआधीच तिची बहीण अमनदीपचे कावीळने निधन झाले. अमनदीप ही देखील अभिनेत्री होती. दोन्ही मुलीच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Hemangi Kavi : "कपड़े ठीक हैं उनके तुम नज़रें ठीक करो"; जागतिक महिला दिनानिमित्त हेमांगी कवीची हृदयस्पर्शी पोस्ट
Hemangi Kavi : न्याय्य हक्क, समान अधिकारासाठी महिला चळवळींनी केलेल्या संघर्षाची आठवण म्हणून जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. काही दशकांपासून महिला दिन साजरा होत असला तरी महिलांकडे पाहण्याचा पुरुष वर्चस्ववादी दृष्टीकोण आजही कायम असल्याचे दिसते. अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. परितोष त्रिपाठी यांची कविता तिने शेअर करत या कवितेने माझ्या डोळ्यात पाणी आले असल्याचे हेमांगीने सांगितले.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Chala Hawa Yeu Dya : 'पण अपयश नेहमी अनाथ असतं...', महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्यांना 'त्या' पत्रामुळे झाले अश्रू अनावर
Chala Hawa Yeu Dya : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सध्या या मालिकेला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष भाग सुरु आहेत. त्यातच सागर कारंडे (Sgar Karande) याने मंचावर एका भावनिक पत्राचं वाचन केलं. काही दिवसांपासून चला हवा येऊ द्या प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं सांगण्यात येत होतं. तसेच डॉ.निलेश साबळे आणि कुशल बद्रिके यांनी देखील हा कार्यक्रम सोडल्याचं समोर आलं.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
ड्रग्ज घेणं कधी बंद करणार, इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये चाहत्याच्या प्रश्नावर आमिर काय म्हणाला? पाहा व्हिडीओ
Aamir Khan Instagram Live Session : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) नुकताच जामनगरमध्ये अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंटच्या (Radhika Merchant) प्री-वेडिंग पार्टीत थिरकताना दिसला. त्यानंतर आमिर खानच्या व्हायरल होणाऱ्या लूकने चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आले होते. त्यातच गुरुवारी आमिर खानने चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत संवाद साधला.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा