Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Fighter Trailer Out : "दिल आसमान के नाम और जान देश के नाम"; अंगावर शहारे आणणारा 'फायटर ' चा ट्रेलर रिलीज!
Fighter Trailer: अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) , अनिल कपूर (Anil Kapoor) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांच्या फायटर (Fighter) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर देशभक्ती भावना जागृत करणारा आहे. ट्रेलरमधील एरियल अॅक्शन सीन्स तुमचं लक्ष वेधतील.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Prabhas : काळं शर्ट, लुंगी अन् बरचं काही, संक्रांतीला प्रभासच्या 'द राजा साब'ची पहिली झलक समोर; लुंगी स्टाईलने वेधलं चाहत्यांचं लक्ष
Prabhas Raja Saab Poster Out : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या त्याच्या आगामी 'सालार' (Salaar) या सिनेमामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धमाकेदार कमाई करत आहे. 'सालार'नंतर प्रभासचा 'द राजा साब' (The Raja Saab) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संकांतीच्या दिवशी या सिनेमाची पहिली झलक समोर आली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Captain Miller : धनुषच्या अभिनयासाठी पाहावा असा ‘कॅप्टन मिलर’
Captain Miller : इंग्रजांनी भारतावर राज्य करण्यापूर्वी आणि भारतीय जनतेवर अत्याचार करण्यापूर्वी भारतातील राजे महाराजे देशावर राज्य करीत होते आणि देशातील जनतेवर अनन्वित अत्याचार करीत होते. आदिवासी आणि मागास समुदायाला या राजे -महाराजांनी आपल्या कामासाठी वापरून घेतले पण त्यांना मुख्य प्रवाहात येऊ दिले नाही.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Amitabh Bachchan : 22 जानेवारीला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा, अमिताभ बच्चन होणार अयोध्यावासी; तब्बल 14 कोटी खर्च करत घेतला मोठा निर्णय
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या चर्चेत आहेत. पण यंदा बिग बी कोणत्याही कलाकृतीमुळे चर्चेत नसून एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. 22 जानेवारीला अयोध्येत (Ayodhya) होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं त्यांना खास आमंत्रण देण्यात आलं आहे. अशातच आता ते अयोध्यावासी होणार असल्याचं समोर आलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Munawwar Rana Passed Away : शब्दांचा जादूगार हरपला! लोकप्रिय कवी मुनव्वर राणा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Munawwar Rana Passed Away : आपल्या आवाजाने चाहत्यांना भुरळ घालणारे शब्दांचे जादूगार, लोकप्रिय उर्दू कवी मुनव्वर राणा (Munawwar Rana) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 71 व्या वर्षी लखनौच्या पीजीआय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.