Fighter Trailer:  अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) , अनिल कपूर (Anil Kapoor) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांच्या फायटर (Fighter) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर देशभक्ती भावना जागृत करणारा आहे. ट्रेलरमधील एरियल अॅक्शन सीन्स तुमचं लक्ष वेधतील.


अंगावर शहारे आणणारे अॅक्शन सीन्स आणि जबरदस्त डायलॉग्स


फायटर या चित्रपटाचा तीन मिनिट नऊ सेकंदांचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये वायुसेनेच्या कथेची झलक दाखवण्यात आली आहे. "फायटर वो नहीं है जो अपने टार्गेट अचिव्ह करता हैं, वे है जो उन्हें ठोक देता है" या हृतिकच्या डायलॉगनं फायटर फायटर या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. त्यानंतर ट्रेलरमध्ये दीपिका आणि अनिल कपूर यांची झलक दिसते. या ट्रेलरमध्ये  अंगावर शहारे आणणारे  एरियल अॅक्शन सीन्स तुम्हाला बघायला मिळतील.


हृतिक रोशनने फायटरचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करुन त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, "दिल आसमान के नाम, और जान देश के नाम । जय हिन्द! . हृतिकनं शेअर केलेल्या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


पाहा ट्रेलर:






फायटर या चित्रपटात हृतिकने स्क्वाड्रन लीड शमशेर पठानियाची भूमिका साकारली आहे, तर दीपिका पदुकोण स्क्वाड्रन लीडर मीनल राठोडच्या भूमिकेत दिसणार आहे. फायटर या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असे काही सीन्स आहेत जे तुम्हाला थक्क करतील.


कधी रिलीज होणार फायटर?


फायटर या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदुकोणसह अनिल कपूर, अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोवर, आकर्ष अलग आणि संजीदा शेख हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 25 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Fighter Song Out : 'फायटर' सिनेमातील पहिलं गाणं आऊट! 'शेर खुल गए'मध्ये दिसला हृतिक-दीपिकाचा रोमँटिक अंदाज