Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Krishna Mukherjee Accuses Shubh Shagun Producer : मी कपडे बदलत होती आणि निर्मात्याने... अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग


Krishna Mukherjee Accuses Shubh Shagun Producer:  सिने आणि टीव्ही इंडस्ट्रीतील ग्लॅमरस जगातील बऱ्या वाईट प्रसंगाची अनेकदा चर्चा होत असतात. मुलींसाठी हे क्षेत्र किती सुरक्षित आहे, याची चर्चादेखील होत असते. अभिनेत्रींनीदेखील अनेकदा त्यांच्यावर ओढावलेल्या प्रसंगावर भाष्य केले आहे.  आता या यादीत छोट्या पडद्यावरील आणखी एका अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने (Krishna Mukherjee) आपल्यावर बेतलेला प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Actor Missing : 'तारक मेहता का...' मधील सोढी बेपत्ता, दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू, चार दिवसांपूर्वीची पोस्ट चर्चेत


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Sodhi Missing :  छोट्या  पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील 'रोशन सिंह सोढी'ची भूमिका साकारणारे अभिनेते  गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. गुरुचरण सिंह हे बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सिंह यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. तर, सोढी यांनी चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने एक पोस्ट केली होती. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Salman Khan House Firing : टार्गेट मुंबईतील सलमान खान, प्रॅक्टिस बिहारमध्ये!आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड


Salman Khan House Firing : बॉलिवू़डचा दबंग स्टार सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) तपास सुरू आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. यामध्ये सलमानच्या घरावर गोळीबार करणारे दोघेजण आहे. तर, दोन जणांनी या हल्लेखोरांना शस्त्रे पुरवल्याचा पोलिसांचा आरोप आहे. आता आरोपींच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Ranbir Kapoor Sai Pallavis First Look From Ramayana : राम-सीतेच्या व्यक्तीरेखेत दिसले रणबीर-साई पल्लवी; 'रामायण'च्या सेटवरून फोटो लीक


Ranbir Kapoor Sai Pallavi First Look From Ramayana : नितेश तिवारी (Nitesh Tiwari) दिग्दर्शित रामायण चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. चित्रपटात कलाकारांची मांदियाळी दिसणार असल्याने चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) मोठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे रणबीरच्या चाहत्यांना त्याच्याकडून मोठी अपेक्षा आहे. मुंबईत 'रामायण'च्या (Ramayana Movie) चित्रीकरणासाठी भव्य सेट लावण्यात आला आहे. या सेटवरून आता राम आणि सीताच्या व्यक्तीरेखेत असलेल्या रणबीर आणि साई पल्लवीचे (Sai Pallavi) फोटो लीक (Ranbir Kapoor Sai Pallavi Photo leaked)  झाले आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Amitabh Bachchan : तुम्हालाही बिग बींचे शेजारी व्हायचं आहे? मग मोजावे लागतील इतके रुपये, जलसाजवळील बंगल्याचा होणार लिलाव


Amitabh Bachchan : 'बिग बी 'अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे भारतीय सिनेसृष्टीमधील सुपरस्टार आहे. बॉलिवूडचे शहेनशाह असलेल्या अमिताभ बच्चन यांचे स्टारडम कायम आहे. मागील काही दशकांपासून अमिताभ बच्चन हे भारतीय प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. बिग बींची बॉलिवूडमधील सेकंड इनिंगही मोठी दमदार आहे. मोठ्या पडद्यासह छोट्या पडद्यावरही अमिताभ बच्चन यांची हुकूमत असल्याचे दिसते. अमिताभ बच्चन हे मुंबईतील जलसा बंगल्यात राहतात. अमिताभ यांचा शेजारी होण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा