Ranbir Kapoor Sai Pallavi First Look From Ramayana : नितेश तिवारी (Nitesh Tiwari) दिग्दर्शित रामायण चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. चित्रपटात कलाकारांची मांदियाळी दिसणार असल्याने चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) मोठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे रणबीरच्या चाहत्यांना त्याच्याकडून मोठी अपेक्षा आहे. मुंबईत 'रामायण'च्या (Ramayana Movie) चित्रीकरणासाठी भव्य सेट लावण्यात आला आहे. या सेटवरून आता राम आणि सीताच्या व्यक्तीरेखेत असलेल्या रणबीर आणि साई पल्लवीचे (Sai Pallavi) फोटो लीक (Ranbir Kapoor Sai Pallavi Photo leaked)  झाले आहेत. 


प्रभू श्रीरामाच्या लूकमध्ये दिसला रणबीर कपूर...


रामायणाच्या सेटवरून लीक झालेल्या फोटोंमध्ये रणबीर रामच्या रुपात दिसत आहे. त्याने मरून आणि जांभळ्या रंगाचा आउटफिट कॅरी केला आहे. गळ्यात सोन्याचा हार आणि बाजूबंद दिसत आहे. तर अभिनेत्री साई पल्लवीही सीतेच्या व्यक्तीरेखेत खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर साधेपणा दिसून येतो. सुरुवातीची काही छायाचित्रे पाहता हे लीक झालेले फोटो प्रभू श्रीराम आणि सीता यांच्या विवाहानंतरच्या दृष्यातील आहेत, असा अंदाज आहे. 






 








रावण आणि हनुमानाची होणार एन्ट्री


काही दिवसांपूर्वीच कैकयीच्या व्यक्तीरेखेत असलेल्या लारा दत्ता आणि मंथराच्या व्यक्तीरेखेत असलेल्या  शीबा चढ्ढा यांचे सेटवरील फोटो लीक झाले होते. त्याशिवाय, राजा दशरथच्या भूमिकेत अरुण गोविलही दिसले होते. जुलै महिन्यापासून रावण आणि हनुमान यांच्या व्यक्तीरेखेचे चित्रीकरण सुरू आहे.  हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल दिसणार आहे. तर, रावणाची व्यक्तीरेखा अभिनेता यश साकारणार असल्याची चर्चा आहे. 


'रामायण'मध्ये या कलाकारांची आहे भूमिका


नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये रणबीर हा प्रभू रामाच्या अवतारात दिसणार आहे. अभिनेत्री साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे. भगवान हनुमानासाठी सनी देओलच्या नावाची पुष्टी झाली आहे, मात्र अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कुंभकर्णच्या भूमिकेसाठी बॉबी देओलला विचारणा करण्यात आली आहे. अशीही एक अफवा आहे की विजय सेतुपती रावणाचा भाऊ विभीषणाची भूमिका साकारणार आहे. 


इतर संबंधित बातमी :