(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tejaswini Pandit : मला तू खूप आवडतोस...; तेजस्विनी पंडितची पोस्ट चर्चेत
Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडितची सोशल मीडिया पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
Tejaswini Pandit : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिचा आगामी 'बांबू' (Bamboo) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा टीझर शेअर करत तेजस्विनीने एक हटके कॅप्शन लिहिलं आहे. तिच्या कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
तेजस्विनीने लिहिलं आहे,"मुलींचं फेवरेट वाक्य.... तुमच्याबरोबर असं झालंय का? मला तू खूप आवडतोस पण... आणि मग लागतात 'बांबू". तेजस्विनीने चाहत्यांना प्रश्नदेखील विचारला आहे,'बांबू'चा टीझर पाहिलात का?". तेजस्विनीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
तेजस्विनी पंडितच्या 'बांबू' या सिनेमाचा टीझर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. विशाल देवरूखकरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव, स्नेहल शिदम, समीर चौघुले मुख्य भूमिकेत आहेत. तर तेजस्विनी पंडित या सिनेमाची निर्माती आहे.
तेजस्विनीचा 'बांबू' कधी होणार प्रदर्शित?
'बांबू' हा सिनेमा 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनयचा एक वेगळा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचा हा नवा अंदाजदेखील प्रेक्षकांना नक्की आवडेल. हा सिनेमा तरुणाईला भुरळ घालणारा आहे. या सिनेमाची कथा प्रेक्षकांना आपली वाटेल. प्रेमाची आठवण करुन देणारा 'बांबू' हा सिनेमा आहे.
तेजस्विनी पंडित एक उत्तम अभिनेत्री आहे. पण आता तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. वेगवेगळ्या कलाकृतींची निर्मिती करण्यासाठी तिने निर्मिती होण्याचा घाट घातला आहे.
संबंधित बातम्या