HIT The First Case Teaser Out : राजकुमार रावच्या 'हिट'चा टीझर आऊट; 15 जुलैला सिनेमा होणार प्रदर्शित
HIT : राजकुमार राव आणि सान्या मल्होत्राच्या 'हिट- द फर्स्ट केस' या सिनेमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
HIT The First Case Teaser Out : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राजकुमारचा 'हिट- द फर्स्ट केस' (HIT The First Case) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. हा रहस्यमय टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता लागली आहे. या सिनेमात राजकुमारसोबत सान्य मल्होत्रादेखील (Sanya Malhotra) दिसणार आहे.
'हिट'चा टीझर सुपरहिट
राजकुमार रावने सोशल मीडियावर 'हिट'चा टीझर शेअर केला आहे. 15 जुलै 2022 ला 'हिट- द फर्स्ट केस' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे कथानक होमिसाइंड इंटरवेंशनमधील एका अधिकाऱ्यावर आधारित आहे. हा सिनेमा 'हिट- द फर्स्ट केस' या तेलुगू सिनेमाचा रिमेक आहे. शैलेन कोलानुने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या तेलुगू सुपरहिट सिनेमात विश्व सेन आणि अभिनेत्री रुहानी शर्मा मुख्य भूमिकेत होते.
View this post on Instagram
'या' दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'हिट- द फर्स्ट केस' या सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेता राजकुमार राव एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सान्या मल्होत्रादेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. टी-सीरिजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना 15 जुलैला पाहायला मिळणार आहे.
दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक
'हिट- द फर्स्ट केस' हा सिनेमा 2020 मध्ये रिलीज झालेल्या 'हिट' या दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे. सिनेमात एका अशा पोलिसाची गोष्ट दाखवण्यात आली आहे, जो एका महिलेचा शोध घेत आहे. 'हिट - द फर्स्ट केस' या चित्रपटामधून पहिल्यांदाच राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
संबंधित बातम्या