Teacher's Day 2023: पाच सप्टेंबर हा दिवस  खूप खास आहे. दरवर्षी या दिवशी भारतात 'शिक्षक दिन' (Teacher's Day 2023) साजरा केला जातो. शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्याला घडवत असतो. अनेक बॉलिवूडमधील कलाकारांनी रुपेरी पडद्यावर शिक्षकाची भूमिका साकारली आहे. जाणून घेऊयात अशा कलाकारांबद्दल ज्यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या शिक्षकाच्या भूमिकेनं प्रेक्षकांची मन जिंकली...



अर्चना पूरन सिंह (Archana Puran Singh)


अभिनेत्री अर्चना पूरन सिंहचा 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.  अर्चना पूरन सिंहने या चित्रपटात मिस बिग्रँजा ही भूमिका साकारली. अर्चना पूरन सिंह साकारलेल्या या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं होतं.






सुष्मिता सेन (Sushmita Sen)



2004 मध्ये प्रदर्शित झालेला फराह खानचा  'मैं हूं ना' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात सुष्मिता सेनने  शिक्षिकेची भूमिका साकारून लोकांची मने जिंकली होती. या चित्रपटातील तिच्या एन्ट्रीवर टाळ्यांचा कडकडाट झाला होता. तिच्या साडीतील स्टाईलने लोकांची मने जिंकली होती. या चित्रपटात तिनं शाहरुख खानसोबत काम केलं होतं. चित्रपटामधील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली.






करीना कपूर (Kareena Kapoor)



करीना कपूरने 'कुर्बान' चित्रपटात प्रोफेसरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिनं सैफ अली खानसोबत स्क्रिन शेअर केली होती.


चित्रांगदा सिंह (Chitrangada Singh)



2011 मध्ये रिलीज झालेला अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमचा देसी बॉईज चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. चित्रपटात चित्रांगदा सिंहने एका कॉलेज प्रोफेसरची भूमिका साकारली होती. 


बोमन इराणी (Boman Irani)



अभिनेते बोमन इराणी यांनी थ्री इडियट्स या चित्रपटात  विरू सहस्त्रबुद्धे ही भूमिका साकारली होती.थ्री इडियट्स या चित्रपटामधील त्यांच्या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं.


महत्त्वाच्या बातम्या : 


Teacher's Day 2023 Gift : शिक्षक दिनानिमित्त तुमच्या आवडत्या शिक्षकांना 'या' भेटवस्तू द्या; दिवसाचा आनंद द्विगुणित करा