800 Poster:  श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनच्या (Muttiah Muralitharan)  आयुष्यावर आधारित असणारा 800 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. उद्या (मंगळवार) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणार आहे. 800 चित्रपटाचा ट्रेलर लाँचचा कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडणार आहे. तरण आदर्श यांनी एक ट्वीट शेअर करुन 800 चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाची माहिती दिली आहे.


तरण आदर्श यांनी ट्वीटमध्ये लिहिलं,  'सचिन तेंडुलकर हा ‘800’ या मुथय्या मुरलीधरनच्या बायोपिकच्या  ट्रेलरचे अनावरण करणार आहे. 5 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या इव्हेंटमध्ये सचिन हा 800 या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच करेल'


कोण साकारणार मुथय्या मुरलीधरनची भूमिका?


800 या  चित्रपटामध्ये कोणता अभिनेता मुथय्या मुरलीधरनची भूमिका साकारणार आहे? हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं एक पोस्टर रिलीज करण्यात आलं. या पोस्टरवर  मधुर मित्तल हा मुथय्या मुरलीधरनच्या लूकमध्ये दिसला. 800 चित्रपटात  मधुर मित्तलला मुथय्या मुरलीधरनची भूमिका साकारताना पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 


तरण आदर्श यांनी ट्वीटमध्ये माहिती दिली की, मूव्ही ट्रेन मोशन पिक्चर्स आणि विवेक रंगाचारी यांनी 800 या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट  तमिळ, हिंदी आणि तेलुगू या भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट ही ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात जाहीर केली जाणार आहे.






कोण आहे मधुर मित्तल?


मधुर मित्तलनं 'स्लमडॉग मिलेनियर' या ऑस्कर विजेत्या चित्रपटात सलीम ही भूमिका साकारली होती. तसेच त्यानं  मिलियन डॉलर आर्म,कहीं प्यार ना हो जाये या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.


800 या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन एम.एस. श्रीपती यांनी केले आहे. क्रिकेटपटू मुरलीधरन हा यशस्वी गोलंदाज कसा बनला, हे 800 या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात दाखवले जाईल.  






 इतर महत्वाच्या बातम्या:


800 Poster: '800' चा फर्स्ट लूक रिलीज; 'हा' अभिनेता मुथय्या मुरलीधरनच्या भूमिकेत