Teacher's Day 2023 Gift : आजचे विद्यार्थी हे उद्याच्या जगाचे भविष्य आहेत आणि या भविष्याला घडविण्याचे काम हे शिक्षक करतात. मनुष्याच्या आयुष्यातील शिक्षकाचे स्थान लक्षात घेऊन जगभरात दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी त्यांच्या गुरूंसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. शिक्षकांना पुष्पगुच्छ, चॉकलेट्स देऊन त्यांना शुभेच्छा देतात. त्यामुळे या शिक्षक दिनाला देखील तुम्हाला तुमच्या लाडक्या शिक्षकांना काही खास भेटवस्तू द्यायच्या असतील तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी काही खास ऑप्शन्स घेऊन आलो आहोत. चला तर जाणून घेऊयात...
शिक्षकांसाठी काही खास गिफ्ट ऑप्शन्स...
1. हाताने बनवलेले ग्रीटिंग कार्ड :
शिक्षकांप्रती प्रेम, भावना, आदर व्यक्त करण्यासाठी तुम्ही हाताने तयार केलेले ग्रीटिंग कार्ड शिक्षकांना भेटवस्तू म्हणून देऊ शकतात. यामुळे तुमचे शिक्षक नक्कीच तुमचं कौतुक करतील तसेच त्यांना तुमचं गिफ्टही आवडेल.
2. पेन :
शिक्षकांसाठी पेनाचं विशेष महत्त्व आहे. पेनच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवले जाते. कस्टमाईज्ड पेन शिक्षकांसाठी सर्वोत्तम भेटवस्तूंपैकी एक ठरू शकतो. तुम्ही पेनवर तुमच्या शिक्षकाच्या नावाची आद्याक्षरे किंवा पूर्ण नाव लिहून ते देऊ शकता.
3. फोटो फ्रेम :
फोटो फ्रेम प्रत्येकाला आवडते. फोटो फ्रेम हासुद्धा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या शिक्षक दिनी, तुमच्या शिक्षकांची सर्वोत्तम चित्रे फ्रेम करून त्यांना द्या.
4. कॉफी मग :
जर तुमचे शिक्षक कॉफी प्रेमी असतील, तर त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम भेट ठरू शकते. तुम्ही त्यांचे नाव कॉफीवर कस्टमाईज्ड केलेले गिफ्ट शिक्षकांना देऊ शकता.
5. फुलं :
सुगंधित फुलं, पुष्पगुच्छ कोणाला आवडत नाहीत. लग्न समारंभ, वाढदिवस, किवा स्वागत समारंभ, सत्कार सोहळा अशा प्रत्येक प्रसंगी फुलं ही त्या सोहळ्याची शान वाढवतात. तुम्ही या गिफ्टचा देखील विचार करू शकता.
6.चॉकलेट्स :
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला चॉकलेट्स खायला आवडतात. शिक्षक दिनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्ही शिक्षकांना त्यांच्या आवडते चॉकलेट गिफ्ट करू शकतात.
7. केक :
शुभ कार्यक्रमाची शोभा अधिक वाढविण्यासाठी आणखी एक भेट तुम्ही देऊ शकतात ते म्हणजे केक. तुम्ही तुमच्या शिक्षकांसाठी छान केक तयार करून घेऊन जाऊ शकता.
8. पेंटिंग :
जर तुमचे शिक्षक कलाप्रेमी असतील, तर पेंटिंगपेक्षा उत्तम भेटवस्तू कोणतीही असू शकत नाही. आपल्या भावना व्यक्त करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे कला. जर तुम्ही कलाकार असाल तर तुम्ही तुमच्या शिक्षकांसाठी हाताने तयार केलेली पेंटिंग भेट म्हणून देऊ शकता.
महत्त्वाच्या बातम्या :