Munmun Dutt : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ootah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या मालिकेत बबिता जीची भूमिका साकारणारी मुनमून दत्ता (Munmun Dutt) आणि टप्पूची भूमिका साकारणारा राज अनडकट (Raj Anadkat) यांचा साखरपुडा झाल्याची चर्चा होती. अखेर मुनमूनने याप्रकरणावर मौन सोडलं. तर दुसरीकडे टप्पूआधी बबिताजी एका वेगळ्याच अभिनेत्याच्या प्रेमात वेडी असल्याचं समोर आलं आहे. त्यांचं नातं तुटल्यावर अभिनेत्रीने आयुष्य संपवण्याचा विचार केला होता.


मुनमून दत्ताचं नाव नेहमीच कोणत्या ना कोणत्या अभिनेत्यासोबत जोडलं जातं. तिच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधित प्रत्येक अपडेट चाहते जाणून घेत असतात. मुनमून दत्ता अभिनेता अरमान कोहलीसोबत (Armaan Kohli) रिलेशनमध्ये होती. दोघांमध्ये अनेकदा वाद झाले आहेत. अरमान मुनमूनला मारहाण करत असे. त्यामुळे तिच्या मनात अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार आला होता.


अभिनेत्री डॉली ब्रिंद्राने दावा केला आहे की, मुनमून आणि अरमान सतत भांडत असे. अरमानने अनेकदा मुनमूनला मारहाण केली आहे. पण त्यांनी त्यांचं नातं कधीच जगजाहीर केलं नाही. अखेर मुनमूनने एक दिवस सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत अरमानसोबत नाव जोडण्यावरुन आपली नाराजी व्यक्त केली होती. 


मुनमूनची पोस्ट काय होती? 


मुनमूनने लिहिलं होतं,"अरमानसोबतच्या फेक न्यूज पसरवणं कृपया थांबवा. मी यासंदर्भात मौन ठेवलं कारण मला वाटायचं कधीतरी या चर्चा थांबतीत. पण या चर्चा अजूनही सुरुच आहेत".






मुनमून दत्ताचं नाव राज अनादकटसोबत जोडलं जात आहे.  राज तिच्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे. मुनमून आणि राजचा साखरपुडा झाला असल्याची चर्चा होती. अनेर मुनमूनने पुन्हा एकदा खास पोस्ट शेअर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राजनेही हे वृत्त फेटाळून लावलं आहे.


मुनमून आणि राजच्या अफेअरच्या चर्चा 


मुनमून आणि राज यांच्या अफेरच्या चर्चा सुरू आहेत. राजची 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत एन्ट्री झाल्यानंतर त्याची मुनमूनसोबत ओळख झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली असल्याची चर्चा आहे.


संबंधित बातम्या


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : टप्पूसोबत साखरपुडा झालाय? बबिताजींनी सोडलं मौन, खरंतर ही बातमी...