Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Munmun Dutta :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) बबिता आणि टप्पू अर्थात मुनमून दत्ता (Munmun Dutta) आणि  राज अनडकट (Raj Anadkat) यांचा साखरपुडा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर चर्चांना जोरदार उधाण आले.  सोशल मीडियावरही चर्चा रंगल्यानंतर आता मुनमून दत्ताने या प्रकरणावर मौन सोडले. 


'तारक मेहता का उल्टा चष्मा' शोमध्ये मुनमुन दत्ता म्हणजेच बबिताजी आणि तिच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान असलेला टप्पू म्हणजे राज अनाडकट यांनी मुंबईबाहेर वडोदरा येथे साखरपुडा केल्याचे वृत्त होते. मुनमुन दत्ताचे वय 36 वर्ष असून राज अनाडकटचे वय 27 वर्ष आहे. या दोघांमध्ये 9 वर्षांचे अंतर आहे. 


साखरपुडा झालाय का,  मुनमूनने सांगितलं... 


राजसोबतच्या साखरपुड्याच्या बातमी व्हायरल झाल्यानंतर आता मुनमुन दत्ताची प्रतिक्रियाही समोर आली आहे. मुनमूनने या बातम्यांना पूर्ण निराधार असल्याचे म्हटले आहे. Indiaforums सोबत बोलताना तिने अशा प्रकारचे वृत्त निराधार असल्याचे म्हटले. अशा खोट्या बातम्यांवर सातत्याने बोलून आपली ऊर्जा आणि वेळ वाया घालवायची नाही असेही तिने म्हटले. 


राजनेही फेटाळले वृत्त 


टप्पूची भूमिका साकारणारा राज अनडकटनेदेखील वृत्त फेटाळून लावले आहे. त्याच्या टीमने सांगितले की, सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा निराधार आहेत. 






बडोद्यात साखरपुडा झाल्याचे वृत्त


याआधी, न्यूज 18 च्या वृत्तानुसार, अभिनेत्यांच्या जवळच्या एका सूत्राच्या हवाल्याने त्यांच्या साखरपुड्याची माहिती दिली. या दोघांनी काही दिवसांपूर्वी मुंबईबाहेर म्हणजेच बडोदा येथे आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत हा साखरपुडा केला असल्याची माहिती दिली सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली. 


वर्षभरापासून मुनमुन आणि राज यांच्या अफेअरची चर्चा 


मुनमुन आणि राज यांच्या अफेअरच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत होत्या. काही वृत्तानुसार, जेव्हा राजने शोमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांची मुनमुनशी भेट झाली आणि हळूहळू त्यांच्यात मैत्री निर्माण झाली आणि मग प्रेम फुलू लागले. यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले. शोच्या बाकी कलाकारांनाही याची जाणीव होती. सध्या या शोमध्ये राज काम करत नाही. काही काळ काम केल्यानंतर त्याने शोला निरोप दिला.