Amitabh Bachchan at Stadium : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावर अँजियोग्राफी करण्यात आली असून आता त्यांना डिस्चार्जदेखील मिळाला आहे. डिस्चार्ज मिळताच बिग बी थेट स्टेडियममध्ये गेले. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यासोबत त्यांनी क्रिकेट सामन्याची मजा लुटली. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


अमिताभ बच्चन यांना 15 मार्च 2024 रोजी सकाळी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी (Kokilaben Dhirubhai Ambani) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी एक ट्वीट करत चाहत्यांचे आभार मानले. पुढे काही तासांनी त्यांना डिस्चार्ज मिळाला. अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली होती. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सायंकाळी ते अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यासोबत स्टेडियममध्ये गेले. 'आयपीएल टी 10' (IPL T20) या  सामन्याची मजा लुटताना ते दिसून आले.






बिग बी म्हणाले,"फेक न्यूज"


अमिताभ बच्चन यांनी अभिषेक आणि सचिनसोबत क्रिकेट पाहतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अमिताभ यांना स्टेडियममध्ये पाहून चाहते हैराण झाले होते. स्टेडियममध्ये बिग बींनी अँजिओग्राफी करण्यात आल्याच्या बातमीला 'फेक न्यूज' असे म्हटले आहे.  


इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली आहे. कोकिलाबेन रुग्णालयातील डॉक्टरांनी यासंदर्भात माहिती दिलेली आहे. लवकरच यासंदर्भात बिग बी खरी माहिती देतील असे म्हटले जात आहे.






अमिताभ बच्चन यांच्याकडे सिनेमांची रांग (Amitabh Bachchan Upcoming Movies)


अमिताभ बच्चन यांनी 'कल्कि 2898 एडी' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. 9 मे 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन यांच्यासह या सिनेमात प्रभास (Prabhas), कलम हासन (Kamal Haasan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि दिशा पटानी (Disha Patani) मुख्य भूमिकेत आहेत. तसेच त्यांचे 'सेक्शन 84','आंखें 2','तेरा यार हूँ मैं' हे सिनेमेदेखील प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. 


संबंधित बातम्या


Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन कोकीलाबेन रुग्णालयात दाखल, मोठी अपडेट समोर