Shah Rukh Khan Gauri Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष खूपच खास होतं. या वर्षातील 'पठाण' (Pathaan), 'जवान' (Jawan) आणि 'डंकी' (Dunki) या त्याच्या तिन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवण्यात किंग खानला यश आलं आहे. आता त्याच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. शाहरुख व्यावसायिक कामांसह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. शुन्यापासून सुरुवात केलेला 'किंग खान' (King Khan) आज मेहनतीच्या जोरावर सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुख खान हा मुस्लिम असून (Muslim) असून त्याची पत्नी गौरी मात्र हिंदू (Hindu) आहे. त्यामुळे त्यांची तिन्ही मुले नक्की कोणता धर्म मानतात हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.


शाहरुख खान मुस्लिम (Muslim) आहे. तर त्याची पत्नी गौरी (Gauri Khan) हिंदू आहे. एका हिंदू परिवारातील मुलीसोबत शाहरुखने लग्न केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख मुस्लिम असल्यामुळे सुरुवातीला गौरीच्या वडिलांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. 


शाहरुखची मुलं कोणता धर्म मानतात? (Shah Rukh Khan Children Follow This Religion)


करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात गौरी खान म्हणाली होती,"शाहरुख खान धर्माबाबत रुढीवादी नाही. त्यामुळे आमच्या घरी दिवाळी, होळी, ईद असे सर्व सण जल्लोषात साजरे केले जातात. आमची मुलंदेखील हे सर्व सण धुमधडाक्यात साजरा करतात". 


गौरी पुढे म्हणते,"शाहरुख त्याच्या कामांमध्ये व्यस्त असतो. त्यामुळे सणांची तयारी करण्याची जबाबदारी मी सांभाळते. मी हिंदू असल्यामुळे मुलांवर त्याचा परिणाम जास्त आहे. मुलांवर आईचा प्रभाव जास्त पडत असतो. पण त्यांनी कोणत्या धर्माचं पालन करावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. आम्ही त्यांना काहीही सांगितलेलं नाही. मी हिंदू असून पतीच्या धर्माचा आदर करते. शाहरुखदेखील हिंदू धर्माचा आदर करतो. आर्यन त्याच्या वडिलांच्या जास्त क्लोज असून तो मुस्लिम धर्म फॉलो करतो". 


"आपण भारतीय आहोत" : शाहरुख खान


धर्माबाबत बोलताना शाहरुख खान म्हणाला होता,"धर्माआधी आपण एक व्यक्ती आणि भारतीय आहोत. माझ्या मुलांनाही मी ही शिकवण दिली आहे. मुलांनी शाळेतील एक फॉर्म भरताना त्यावर कोणता धर्म लिहू असं मला विचारलं होतं त्यावर मी त्यांना 'भारतीय' असं लिहायला लावलं होतं". 


शाहरुख आणि गौरी खान 1991 मध्ये लग्नबंधनात अडकले. शाहरुख-गौरीचा आधी निकाह झाला असून नंतर हिंदू रितीरिवाजानुसार त्यांनी लग्न केलं. पहिल्या नजरेतच शाहरुख गौरीच्या प्रेमात पडला होता.


संबंधित बातम्या


Bollywood Richest Couple : बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत जोडी, दोघांची संपत्ती पाहून तुमचे डोळे फिरतील; नाव आहे...