एक्स्प्लोर

Sushmita Sen-Lalit Modi Break Up : सुष्मिता अन् ललित मोदींच्या नात्यात बिनसलं? अवघ्या दोन महिन्यांत ब्रेकअपची चर्चा!

Sushmita Sen-Lalit Modi Break Up : आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Sushmita Sen-Lalit Modi Break Up : आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळीही हे दोघे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे ललित मोदींचे इन्स्टाग्राम अकाऊंट. नुकताच ललित मोदी यांनी आपल्या सोशल मीडियाचा डीपी बदलला आहे आणि बायोमधून अभिनेत्रीचे नाव देखील काढून टाकले आहे. यामुळे आता दोघांचे ब्रेकअप झाल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत. यानंतर आता सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

ललित मोदींनी अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची घोषणा सोशल मीडियाद्वारे केली होती. ललित मोदींनी त्यावेळी रिलेशनशिपची केवळ घोषणाच केली नव्हती, तर स्वतःचे आणि सुष्मिताचे अनेक रोमँटिक फोटोही शेअर केले होते. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले होते. मात्र, आता दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत.

नेमकं काय झालं?

ललित मोदींनी काही दिवसांपूर्वी आपल्या नात्याची घोषणा केल्यानंतर सुष्मिता सेनसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. यानंतर बायोमध्ये देखील सुष्मिता सेनसाठी एक पोस्ट लिहिली होती. आता ललित मोदींनी त्यांच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये मोठा बदल केला आहे. ललित मोदींनी इंस्टाग्रामवरील आपला फोटो बदलला आहे, त्यासोबत बायोमधील सुष्मिता सेनचे नाव देखील काढून टाकले आहे. यामुळेच आता सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना हवा मिळत आहे. जेव्हा, ललित मोदीं यांनी अभिनेत्रीसोबतच्या नात्याची घोषणा केली, तेव्हा बायोमध्ये लिहिले होते की, त्यांनी सुष्मिता सेनसोबत नवीन आयुष्य सुरू केले आहे. यासोबतच अभिनेत्रीला ‘पार्टनर इन क्राईम’ आणि ‘लव’ देखील म्हटले होते. मात्र, आता हे सगळे काढून टाकण्यात आले आहे.

बायो आणि डीपी बदलल्यानंतर, ललित मोदींकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. मात्र, आता दोघांचे ब्रेकअप झाल्याचा अंदाज लोक सोशल मीडियावर लावत आहेत. त्यांच्या जुन्या बायोचा स्क्रिनशॉट शेअर करून, युजर्स प्रश्न विचारत आहेत की, आता दोघांचे नाते तुटले आहे का? यावर अद्याप सुष्मिता सेन हिने देखील कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

एक्स बॉयफ्रेंडसोबत दिसली सुष्मिता सेन

काही काळापूर्वी अभिनेत्री सुष्मिता सेन रोहमन शॉल (Rohman Shawl) नावाच्या एका मॉडेलला डेट करत होती. मात्र, नुकताच त्यांचा ब्रेकअप झाला होता. त्यानंतर सुष्मिता ललित मोदी यांना डेट करत होती. मात्र, काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा ती एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत स्पॉट झाली होती. सुष्मिता सेनला पुन्हा एकदा रोहमन शॉलसोबत पाहून नेटकरी हैराण झाले होते. पुन्हा एकदा हे दोघे एकत्र स्पॉट झाल्याने ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते.

संबंधित बातम्या

ब्रेकअप के बाद! सुष्मिता सेन पुन्हा एकदा प्रेमात, ललीत मोदींनी पोस्ट केले रोमँटिक फोटो

Lalit Modi Biopic: 'थालावी' आणि '83'चे निर्माता विष्णु वर्धान इंदुरी आता ललित मोदींवर चित्रपट बनवणार 

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget