मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमधून खुलासा करण्यात आला आहे की, 'सुशांतने ज्या दिवशी आत्महत्या केली त्यादरम्यान एका संशयित महिला त्याच्या बिल्डिंगमध्ये जाताना दिसली होती. दरम्यान, या संशयित महिलेची आतापर्यंत ओळख पटलेली नाही.


व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, महिला बिल्डिंगमध्ये जात आहे. तिने निळा आणि पांढऱ्या रंगाचा टॉप वेअर केला असून केस वर बांधले आहेत. रिपब्लिक टीव्हीने केलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमधून हा खुलासा झाला आहे. बिल्डिंगच्या गार्डने या संशयित महिलेबाबत खुलासा केलाय. गार्डने सांगितलं की, तो त्या महिलेला ओळखू शकला नाही. कारण तिने मास्क घातला होता. परंतु, गार्डने सांगितलं की, ती महिला या बिल्डिंगमधील रहिवाशी नव्हती.


सुशांतच्या कुटुंबियांकडूनही ओळखत नसल्याचा दावा


जेव्हा गार्डला विचारलं की, ती महिला आतमध्ये कशी आली, तेव्हा गार्डने सांगितलं की, त्याला वाटलं की ती महिला सुशांतची कोणी नातेवाईक आहे. त्याने हेदेखील सांगितलं की, गार्ड फक्त सुशांतच्या नातेवाईकांना जाण्याची परवानगी देत असे. त्याने सांगितलं की, त्यावेळी आजूबाजूच्या परिसरात अनेक लोक उपस्थित होते. तसेच ती महिलाही पोलिसांसोबत होती. जेव्हा सुशांतच्या कुटुंबियांना या महिलेबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी या महिलेला ओळखत नसल्याचं सांगितलं.


सुशांतच्या पार्थिवाजवळ संशयित व्यक्ती


संशयित महिलेव्यतिरिक्त, आणखी एक संशयित व्यक्ती सुशांतच्या पार्थिवाजवळ असल्याचं दिसून आलं. तिने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. या व्यक्तीच्या हातात काळ्या रंगाची बँगही होती. एवढचं नाहीतर ही व्यक्ती बिल्डिंगमध्ये येताना दिसेल्या संशयित महिलेसोबत बोलताना सुद्धा दिसली, सांगण्यात येत आहे की, ही व्यक्ती दिपेश सावंत आहे. जे सुशांत सिंह राजपूतचे स्टाफ मॅनेजरपैकी एक आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :