मुंबई : भारतीय संघाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती घोषित केली आहे. धोनीच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावरील वातावरण धोनीमय झालं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. धोनीचे फॅन्स त्याचे काही जुने व्हिडीओ शेअर करत आहेत. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीही मागे नाहीत. अनेक सेलिब्रिटींनी धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनेही धोनीसाठी एक इमोशनल नोट लिहली आहे.


जेव्हा धोनीला भेटला होता 22 वर्षांचा रणवीर


कोरोना महामारी दरम्यान रणवीर सिंह आपल्या घरीच आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून महेंद्र सिंह धोनीसोबतची एक आठवण शेअर केली आहे. रणवीर धोनीचा खूप मोठा फॅन असून त्याने धोनीसाठी एक मोठी इमोशनल पोस्ट लिहली आहे. रणवीरने धोनीसोबतचा एक फोटो शेअर करत धोनीसोबत त्याची पहिली भेट कशी झाली होती, हे सांगितलं. रणवीरने एक फोटो शेअर केला आमि सांगितलं की, हा फोटो 2007/2008 दरम्यान कर्जत येथील एनडी स्टुडिओचा आहे. रणवीरने सांगितलं की, 'त्यावेळी मी 22 वर्षांचा असून असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होतो. मी हा जॉब फक्त जाहिरातीच्या शुटींग दरम्यान धोनीला भेटण्यासाठीच केला होता. मला त्यांच्यासोबत राहायचं होतं. माझ्याकडून खूप काम करून घेण्यात आलं होतं आणि पैसेही दिले नव्हते. पण मला काहीच वाटलं नाही, कारण मला फक्त धोनीसोबत राहायचं होतं.'



आपल्या पोस्टमझ्ये रणवीरने पुढे लिहिलं आहे की, 'मी त्यावेळी धडपडलो होतो आणि मला लागलं होतं. परंतु, मला वेदना होत असतानाही मी हा विचार काम करत राहिलो की, माझ्या चांगल्या कामामुळे मला धोनीला भेटण्याची संधी मिळेल. कदाचित फोटोही काढता येईल. मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांना पाहतच राहिलो. ते अत्यंत नम्र असून त्यांच्यात वेगळीच ऊर्जा आहे.' पोस्टच्या शेवटी रणवीरने धोनीला खूप प्रेम, आदर आणि शुभेच्छा दिल्या आहेत.


रणवीरने कॅप आणि जर्सीवर घेतली होती ऑटोग्राफ


रणवीरने सांगितलं की, पहिला चित्रपट 'बँड बाजा बारात'नंतर तो धोनीला भेटण्यासाठी पळतच गेला होता. धोनी आणि रणवीरची हेअर स्टायलिस्ट सपना भवनानी कॉमन होती. तिने रणवीरला सांगितलं की, मला माहिती आहे की, तू धोनीचा खूप मोठा फॅन आहेस, मेहबूब स्टुडिओमध्ये येऊन भेट धोनीला. रणवीरने सांगितलं की, त्यावेळी आपल्या कॅप आणि जर्सीवर त्याने धोनीचा ऑटोग्राफ घेतला होता.'


महत्त्वाच्या बातम्या :