मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवरुन सध्या वातावरण तापले असताना सुशांतची डायरी हाती लागली आहे. या डायरीत सुशांतने आपल्या भविष्याचा प्लान लिहिला होता.
चित्रपट, परिवाराबद्दल सुशांतने आपल्या भावनाही या डायरीत लिहिल्या होत्या. सुशांतला स्वप्नं पाहिली होती, सुशांतने चित्रपटांचे पूर्ण नियोजन केले होते. सुशांतचे 2020 चे नियोजन त्याच्या डायरीच्या पानांमध्ये नोंदवले आहे. आता प्रश्न असा उद्भवला आहे की जेव्हा सुशांतने इतका विचार केला तेव्हा त्याने आत्महत्या का केली?
सुशांत सिंह राजपूतला केवळ स्वप्न पाहणेच माहित नव्हते तर आपल्या मेहनतीने ते पूर्ण करण्याचा विश्वास देखील होता. चित्रपटांमध्ये यश मिळविणे हे सुशांतचे स्वप्न आणि उत्कटता दोन्ही होतं. सुशांत त्याच्या आयुष्यात किती गंभीर होता याची साक्ष त्याच्या डायरीची ही पानं देत आहेत.
सुशांत चित्रपटांसाठी पूर्ण नियोजन करत असे. या डायरी पृष्ठाच्या शीर्षस्थानी सुशांतने लिहिलंय ‘कॅमेर्यासाठी अभिनय, अभिनयासाठी तयारी...’ म्हणजेच सुशांत आपल्या पात्राच्या तयारीसाठी पूर्ण तयारी करत असे. सुशांत स्क्रिप्ट किमान दोनदा वाचायचा.
दुसर्या पानावर सुशांतने लिहील आहे 2020साठी तेच प्लान. या पानावर सुशांत लिहीतो. 2020 मध्ये, कोरोनामुळे, कदाचित हे काम होणार नाही’. परंतु सुशांतने 2020 चं पूर्ण नियोजन डायरीत नोंद केली होती.
सुशांतने आपल्या डायरीत एन आणि पी फॉर्म्युल्यांचा उल्लेखही केला आहे. एन म्हणजे नीड (गरज) म्हणजे सुशांतने लिहिलेले.
मला माझ्याबद्दल आणि माझ्या कुटूंबाबद्दल विचार करायचा आहे. मी कोणालाही गमावू इच्छित नाही. आणि सार्वजनिक ठिकाणी चांगल्या प्रतिमेसाठी, सेल्फ़्लेस म्हणजे नि: स्वार्थ, केरिंग म्हणजे काळजी, काळजी आणि त्याग म्हणजे बलिदान याबद्दलही सुशांतने लिहिलेले आहे.
सुशांतने आपल्या डायरी मध्ये एक चार्टही तयार करुन ठेवला होता. या चार्टच्या माध्यमातून सुशांत आपली संपूर्ण योजना आपल्या डायरीच्या पानांवर लिहिली होती. सुशांत आपल्या भविष्याचे स्वप्न पाहत होता आणि त्यासाठी नियोजन ही करत होता, म्हणूनच कोणीही सुशांत आत्महत्या केली हे मान्य करण्यास तयार नाही.
खास एबीपी माझाच्या वाचकांसाठी माझाच्या हाती आलेली सुशांतच्या डायरीतील ही पानं
Exclusive | सुशांतने डायरीत लिहिला होता आपल्या भविष्याचा प्लान, डायरी एबीपी माझाच्या हाती
गणेश ठाकूर, एबीपी माझा
Updated at:
13 Aug 2020 02:40 PM (IST)
Sushant Singh Rajput's Diary: सुशांत आपली भविष्यातली संपूर्ण योजना आपल्या डायरीच्या पानांवर लिहिली होती. सुशांत आपल्या भविष्याचे स्वप्न पाहत होता आणि त्यासाठी नियोजन ही करत होता, म्हणूनच कोणीही सुशांत आत्महत्या केली हे मान्य करण्यास तयार नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -