नवी दिल्ली : 67व्या राष्ट्रीय चित्रपटांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर अभिनीत चित्रपट 'छिछोरे' सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून गौरवण्यात आलं आहे. चित्रपटगृहात रिलीज झालेला 'छिछोरे' हा सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरला. दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा हा चित्रपट प्रेक्षकांनाही प्रचंड आवडला. तर नॉन फिचर चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हिंदी चित्रपट 'अॅन इंजिनियर्ड ड्रीम'ला मिळाला. याचं दिग्दर्शन हेमंत गावा यांनी केलं आहे. स्पेशल मेंशन पुरस्कारांमध्ये चार चित्रपट 'ब‍िर‍ियानी', 'जोना की पोरबा' (आसम‍िया), 'लता भगवान करे' (मराठी), 'प‍िकासो' (मराठी) यांनी बाजी मारली आहे. 


यंदा एकूण 461 फिचर फिल्म्स राष्ट्रीय पुरस्कारांच्या शर्यतीत पोहोचल्या होत्या. 2019 मधील 'मोस्‍ट फ‍िल्‍म फ्रेंडली स्‍टेट' या श्रेणीतील पुरस्कारासाठी 13 राज्य सहभागी झाली होती. सिक्किमने या शर्यतीत बाजी मारली आहे. 


भारत सरकारच्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अख्त्यारित येणाऱ्या Directorate of Film Festivals या संस्थेतर्फे दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर चित्रपट पुरस्तारांचं वितरण करण्यात येतं. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं हे 67 वं वर्ष. याच पार्श्वभूमीवर केंद्राकडून विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. 2019 या वर्षात प्रदर्शित झालेल्या सर्वच चित्रपटांना या पुरस्कार सोहळ्यात विविध प्रवर्गांमध्ये विभागत गौरवान्वित करण्यात येणार आहे. मागील वर्षी मे महिन्यामध्येच हा पुरस्कार सोहळा पार पडणं अपेक्षित होतं. पण, कोरोना विषाणू संसर्गाच्या धोक्यामुळं तसं होऊ शकलं नाही. 


राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येतं. पण, 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात विजेत्यांना उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांच्या हस्ते पुस्कार प्रदान करण्यात आला होता. ज्यानंतर राष्ट्रपतींकडून विजेत्यांसाठी चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


National Film Awards 2021 | 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर