National Film Awards 2021  भारत सरकारच्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अख्त्यारित येणाऱ्या Directorate of Film Festivals या संस्थेतर्फे दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर चित्रपट पुरस्कारांचं वितरण करण्यात येतं. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं हे 67 वं वर्ष. याच पार्श्वभूमीवर केंद्राकडून विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. 
2019 या वर्षात प्रदर्शित झालेल्या सर्वच चित्रपटांना या पुरस्कार सोहळ्यात विविध प्रवर्गांमध्ये विभागत गौरवान्वित करण्यात येणार आहे. मागील वर्षी मे महिन्यामध्येच हा पुरस्कार सोहळा पार पडणं अपेक्षित होतं. पण, कोरोना विषाणू संसर्गाच्या धोक्यामुळं तसं होऊ शकलं नाही. 


राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येतं. पण, 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात विजेत्यांना उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांच्या हस्ते पुस्कार प्रदान करण्यात आला होता. ज्यानंतर राष्ट्रपतींकडून विजेत्यांसाठी चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 


यंदाच्या वर्षी राष्ट्रीय पुरस्काराचा मान कोणत्या चित्रपटाला मिळणार याचीच उत्सुकता कलाकार मंडळींना लागून राहिली होती. चला तर मग नजर टाकूया विजेत्यांच्या यादीवर ....


Non-feature विभागातील विजेते 


ऑडियोग्राफी - राधा 
ऑन लोकेशन साऊंड रेकॉर्डीस्ट- रहस 
सर्वोत्कृष्ट छायांकन- सविसा सिंह (सोनसी) 
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- नॉक नॉक नॉक 
सर्वोत्कृष्ट कौटुंबीक मुल्य असणारा चित्रपट- ओरु पाथिरा 
सर्वोत्कृष्ट लघू काल्पनिकपट- कस्टडी
सर्वोत्कृष्ट ज्यूरी पुरस्कार - स्मॉल स्केल वॅल्यू
बेस्ट इन्वेस्टीगेटीव्ह - जक्कल 
सामाजिक हक्कांवर आधारित चित्रपट- होली राईट्स (हिंदी), लाडली (हिंदी)
सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट- द स्टॉर्क सेवियर्स


सर्वोत्कृष्ट चित्रपटस्नेही राज्य- सिक्कीम 






सर्वोत्कृष्ट चित्रपट- MARAKKAR ARABIKKADALINTE SIMHAM (मल्याळम)
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- महर्षी 
नर्गिस दत्त बेस्ट फिचर फिल्म पुरस्कार - TAJMAL
सामाजिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- आनंदी गोपाळ 
सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट - कस्तूरी 
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- BAHATTAR HOORAIN (हिंदी) 
सर्वोत्कृष्ट छायांकन - जल्लीकट्टू (मल्याळम) 


बेस्ट इन्वेस्टीगेटीव्ह - जक्कल 
सामाजिक हक्कांवर आधारित चित्रपट- होली राईट्स (हिंदी), लाडली (हिंदी)
सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट- द स्टॉर्क सेवियर्स
सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून) - मनोज बाजपेयी (भोसले), धनुष  (असूरन) 
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - कंगना राणौत (पंगा, मणिकर्णिका) 
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- छिछोरे 
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती) - सोहिनी चट्टोपाध्याय 







सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - बी. प्राक (तेरी मिट्टी- केसरी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - सावनी रविंद्र (रान पेटलं - Bardo)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - पल्लवी जोशी (द ताश्कंद फाईल्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - विजय सेतुपती (सुपर डिलक्स)