एक्स्प्लोर

Sushant Singh Rajput Suicide | पोलिसांकडून आदित्य चोप्रा यांची चार तास चौकशी

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर आतापर्यंत अनेकांची चौकशी झाली आहे. आता यशराज फिल्म्सचे मालक आणि निर्माते आदित्य चोप्रा यांचीही मुंबई पोलिसांनी चार तास कसून चौकशी केली.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलीस तपासात गुंतले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत दोन डझनपेक्षा जास्त अधिक लोकांचा जबाब नोंदवला आहे. त्यामध्ये त्याची कथित गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती, दिग्दर्शक संजय लीला भन्साली, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा तसंच सुशांतच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. आता बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या प्रॉडक्शन बॅनरपैकी असलेल्या यशराज फिल्म्सचे मालक आणि निर्माते आदित्य चोप्रा यांची पोलिसांनी तब्बल चार तास चौकशी करुन जबाब नोंदवला. पोलिसांनी शुक्रवारी सुशांत सिंह राजपूतचा उपचार करणाऱ्या डॉ. केरसी चावडा यांचाही जबाब नोंदवला होता.

सुशांतसोबतच्या कॉन्ट्रॅक्ट आणि चित्रपटांबाबत चौकशी मीडियाला टाळण्यांसाठी वांद्रे पोलिसांनी आदित्य चोप्रा यांची चौकशी अंधेरीतील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये केली. आदित्य चोप्रा सकाळी 9 वाजता वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी चार तास आदित्य चोप्रा यांची कसून चौकशी केली. या चौकशीत 'पानी' चित्रपट आणि यशराज फिल्म्सने सुशांतसोबत झालेल्या करारासंबंधात प्रश्न विचारण्यात आल्याचं समजतं.

सीबीआय तपासाची वाढती मागणी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यात त्याची कथित गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीनेही देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सीबीआय चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर मुंबई पोलिसांवरील तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याचा दबाव वाढला आहे. मात्र महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी प्रतिक्रिया दिली होती. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची गरज नाही कारण या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान व्यायसायिक स्पर्धेच्या पैलूचाही विचार केला जाईल, असंही देशमुख म्हणाले होते.

सुशांत सिंह राजपूतने मुंबईच्या वांद्र्यातील राहत्या घरी 14 जून रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या आत्महत्येबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. सोबतच त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर अनेक कलाकारांनी आपली भूमिका मांडली आहे.

संबंधित बातम्या

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; रिया चक्रवर्तीची अमित शाहांकडे सीबीआय चौकशीची मागणी

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सलमान खानची चौकशी होणार?

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येबाबत संजय लीला भन्साळी यांच्या चौकशीतून काय माहिती मिळाली?

Rhea Chakraborty | सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची सीबीआय चौकशीची मागणी

महत्त्वाच्या बातम्या

Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
Nauheed Cyrusi on Miscarriages: 'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
Embed widget