एक्स्प्लोर

राजकारणात प्रवेशाबाबत रजनीकांत म्हणतात...

चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत यांनी आज तब्बल आठ वर्षांनंतर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राजकारणात प्रवेशाबाबत भाष्य केलं. ''जर मी राजकारणात प्रवेशाचा निर्णय घेतला. तर वाईट प्रवृत्तीच्या लोकांना सदैव दूर ठेवेन,'' असं म्हणाले. त्यांनी चेन्नईत चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 21 वर्षांपूर्वीच्या आपल्या कृतीबद्दलही खेद व्यक्त केला. ते म्हणाले की, ''21 वर्षांपूर्वी काही राजकीय पक्षांच्या आघाडीला समर्थन देऊन चूक केली. त्यावेळी राजकीय फायद्यासाठी माझ्या नावाचा वापर केला गेला, पण मी अद्याप कोणत्याही पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं नाही.'' ते पुढे म्हणाले की, ''परमेश्वरानं आपल्याला अभिनेता बनवलं. आणि मी माझ्या चाहत्यांना कधीही नाराज करणार नाही, असं वचन देतो.'' रजनीकांत यांनी 1996 च्या विधानसभा निवडणुकीत जयललिता यांच्या विरोधात प्रचार केला होता. यामुळे या निवडणुकीत जयललिता यांचा दारुण पराभव झाल्याचं बोललं जातं. दरम्यान, त्यांनी आपल्या चाहत्यांना सिगरेट आणि दारुपासून लांब राहण्याचंही आवाहन केलं.  ते म्हणाले की, ''आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. सिगरेट आणि दारुच्या सेवनामुळे तुमचं आयुष्यच उद्ध्वस्त करु नका. त्याच्या सेवनामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होतो असं नाही. तर त्यामुळे तुमची विचार करण्याची क्षमताही कमकुवत बनते. मी स्वत: याचे दुष्परिणाम अनुभवले आहेत. त्यामुळे माझ्या म्हणण्याचा सर्वांनी गांभीर्यानं विचार करावा,'' असंही ते यावेळी म्हणाले. जयललिता यांच्या निधनानंतर रजनीकांत राजकारणात प्रवेश करतील अशी अनेकांनी शक्यता व्यक्त केली होती. त्यातच रजनीकांत यांनी स्वत: राजकारणात प्रवेशाबाबत भाष्य केल्यानं अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Mallika Sherawat on Tukaram Mundhe: 'तुमच्या नजरेतून काहीच सुटत...' मल्लिका शेरावतकडून तुकाराम मुंढेंचं कौतुक, अस्खलित मराठीत म्हणाली..., चाहते झाले फिदा
'तुमच्या नजरेतून काहीच सुटत...' मल्लिका शेरावतकडून तुकाराम मुंढेंचं कौतुक, अस्खलित मराठीत म्हणाली..., चाहते झाले फिदा
Actress Car Attack: बाप रे! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या चाहत्यांचा धिंगाणा; चारचाकीवर दगडफेक, धक्काबुक्की अन् थेट काच फोडली, काय घडलं?
बाप रे! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या चाहत्यांचा धिंगाणा; चारचाकीवर दगडफेक, धक्काबुक्की अन् थेट काच फोडली, काय घडलं?
'तेव्हा डिप्रेशनमध्ये गेलेले, सगळं असूनही काहीच नसल्यासारखं वाटायचं...'; सांगलीच्या वादानंतर भाग्यश्री पटवर्धनचं 'ते' वक्तव्य चर्चेत
'तेव्हा डिप्रेशनमध्ये गेलेले, सगळं असूनही काहीच नसल्यासारखं वाटायचं...'; सांगलीच्या वादानंतर भाग्यश्री पटवर्धनचं 'ते' वक्तव्य चर्चेत
Tukaram Mundhe: तुमच्यासाठी ते स्टार, सेलिब्रिटी असतील पण माझ्या लेखी ते कायदा मोडणारे; शाहरुख खान, अजय देवगणबाबत तुकाराम मुंढेंचं सडेतोड प्रत्युत्तर
तुमच्यासाठी ते स्टार, सेलिब्रिटी असतील पण माझ्या लेखी ते कायदा मोडणारे; शाहरुख खान, अजय देवगणबाबत तुकाराम मुंढेंचं सडेतोड प्रत्युत्तर

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: मलेशियाला 'बिझनेस ट्रिप'ला जातो सांगून पुण्याचा उद्योगपती गर्लफ्रेंडसोबत फिरायला निघाला; मुंबई विमानतळावर पासपोर्टमुळे 'ड्रामा' अन् बायकोने दाखल केली अपहरणाची केस, नेमकं काय घडलं?
मलेशियाला 'बिझनेस ट्रिप'ला जातो सांगून पुण्याचा उद्योगपती गर्लफ्रेंडसोबत फिरायला निघाला; मुंबई विमानतळावर पासपोर्टमुळे 'ड्रामा' अन् बायकोने दाखल केली अपहरणाची केस, नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Updates: 23 सप्टेंबरपर्यंत 'अलर्ट मोड'! मान्सून मागे फिरला तरी महाराष्ट्रात धो-धो पाऊस बसरणार, विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
23 सप्टेंबरपर्यंत 'अलर्ट मोड'! मान्सून मागे फिरला तरी महाराष्ट्रात धो-धो पाऊस बसरणार, विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Chinchpokli Cha Chintamani 2026 : चिंचपोकळीत बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची झुंबड; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी भाविक आतुर, पाहा PHOTOS
चिंचपोकळीत बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची झुंबड; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी भाविक आतुर, पाहा PHOTOS
Deepanshu Shokeen : NSUI नं उमेदवारी मागं घ्यायला लावली, अपक्ष लढून अनवाणी फिरत प्रचार केला, अभाविपसह सर्वांच्या उमेदवारांना पराभूत केलं, DUSU चा नवा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन नेमका कोण?
वडील कंडक्टर आई अंगणवाडी सेविका, DUSU चा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन ठरला जायंट किलर...
Rahul Gandhi: 'सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
Kalachowki cha Mahaganpati Mumbai: काळाचौकीचा महागणपतीच्या मंडपासमोर रात्री दोन वाजता आक्रित घडलं, 'त्या' लाल वायरवर पाय पडला अन् जोरदार करंट बसला, दोघांचा मृत्यू
काळाचौकीचा महागणपतीच्या मंडपासमोर रात्री दोन वाजता आक्रित घडलं, 'त्या' लाल वायरवर पाय पडला अन् जोरदार करंट बसला, दोघांचा मृत्यू
Mumbai Accident Costal Road : मुंबईच्या कोस्टल रोडवरुन गुजरातची भरधाव BMW कार 50 फूट खाली कोसळली, गाडीचा चेंदामेंदा, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
मुंबईच्या कोस्टल रोडवरुन भरधाव BMW कार 50 फूट खाली कोसळली, गाडीचा चेंदामेंदा, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
LPG Rule Change : कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
Embed widget