एक्स्प्लोर
सनी लिओनी बॉलिवूडनंतर आता मराठी चित्रपटात!
मुंबई : बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केल्यानंतर आता हॉट अँड बोल्ड अभिनेत्री सनी लिओनीने आता आपला मोर्चा मराठी सिनेसृष्टीकडे वळवला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत डान्सचा जलवा दाखवल्यानंतर सनी लिओनी आता मराठी सिनेमात आयटम सॉन्ग करणार आहे.
बॉलिवूडचा फेमस कोरिओग्राफर गणेश आचार्य हे आयटम सॉन्ग कोरिओग्राफ करणार आहे. तर अवधूत गुप्ते हे गाणं संगीतबद्ध करणार आहे. मात्र सिनेमाचं नाव अद्याप निश्चित झालेलं नाही. विशाल देवरुखकर हा या सिनेमाचा दिग्दर्शक आहे. तरुणांशी विषयाशी संबंधित हा सिनेमा असेल, असं म्हटलं जात आहे.
नव्या आयटम सॉन्गविषयी बोलताना सनी म्हणाली की, "मी माझं पहिलं मराठी आयटम सॉन्ग माझ्या आवडत्या कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यासोबत करत आहे. त्याच्या स्टेप्स शानदार असतात, ज्यावर परफॉर्म करताना मज्जा येते."
सनी लिओनी नुकतीच शाहरुख खानच्या रईसमध्ये 'लैला ओ लैला' हे आयटम सॉन्ग केलं होतं. प्रेक्षकांनाही हे गाणं आवडलं होतं. याशिवाय अजय देवगणच्या आगामी 'बादशाहो' सिनेमातही तिचं आयटम सॉन्ग करताना दिसेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement