एक्स्प्लोर
संजू बाबासाठी सनी लिओनीचा नागिन डान्स, व्हिडिओ व्हायरल
संजय दत्तच्या भूमी सिनेमाला शुभेच्छा देण्यासाठी सनी लिओनीने खास नागिन डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. संजय दत्तच्या खलनायक सिनेमातील गाण्यावर सनी लिओनीने हा डान्स केला आहे.
![संजू बाबासाठी सनी लिओनीचा नागिन डान्स, व्हिडिओ व्हायरल Sunny Leone Naagin Dance For Sanjay Dutt संजू बाबासाठी सनी लिओनीचा नागिन डान्स, व्हिडिओ व्हायरल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/13104645/Sunny-2-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने अभिनेता संजय दत्तसाठी जबरदस्त नागिन डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. जो सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाला आहे.
संजय दत्तच्या ‘नायक नही, खलनायक हू मैं’ या गाण्यावर सनी लिओनी नागिन डान्स करत आहे. या डान्सद्वारे सनीने संजय दत्तला त्याचा आगामी सिनेमा ‘भूमी’साठी शुभेच्छा दिल्या आहेत. संजय दत्तच्या या सिनेमात एका गाण्यात सनी लिओनीही दिसणार आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्तचा हा पहिलाच सिनेमा असेल. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. अभिनेत्री अदिती राव हैदरी ‘भूमी’च्या टायटल रोलमध्ये आहे, तर संजय दत्त अरुण ही भूमिका साकारत आहे. दिग्दर्शक शेखर कपूरही या सिनेमात दिसणार आहेत. अत्यंत भावनिक आणि संवेदनशील सूडकथा पडद्यावर पाहायला मिळेल, असं अडीच मिनिटांच्या ट्रेलरमधून दिसत आहे. बापलेकीच्या नात्याचा एक वेगळा पैलू सिनेमात उलगडेल.
संजय दत्तच्या ‘भूमी’च्या पोस्टरचं डिझाईन ‘द ग्रे’ची कॉपी ?
‘भूमी’ सिनेमाची निर्मिती भूषण कुमार आणि संदीप सिंह यांनी केली आहे. मेरी कोम, सरबजित यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे. आमीर खानच्या ‘पीके’ चित्रपटात संजय दत्तने लहानशी व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर जवळपास तीन वर्षांनी चाहत्यांना संजय दत्तला मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. 22 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर :अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)