Munawar Faruqui : स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा (Munawar Faruqui) बंगळुरू येथे होणारा शो रद्द करण्यात आला आहे. मुनव्वरच्या 'डोंगरी टू नोव्हेअर' या शोला पोलिसांनी मान्यता न दिल्याने हा शो रद्द करण्यात आला आहे. पोलिसांची परवानगी न मिळाल्याने कार्यक्रम रद्द करण्याची ही दुसरी वेळ आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,"मुनव्वर फारुकीने पोलिसांची परवानगी न घेता कार्यक्रमाचे आयोजन केलं होते. त्यामुळे सीआरपीसी कलम 149 अंतर्गत मुंबई पोलिसांनी आयोजकांना नोटीस बजावत हा कार्यक्रम होऊ दिला नाही. याआधी देखील मुनव्वरचा हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.
मुनव्वर फारुकी त्याच्या शोमुळे सध्या चर्चेत आहे. त्याच्या कार्यक्रमाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतच्या 'लॉक अप' या कार्यक्रमामुळे मुनव्वर घराघरांत पोहोचला. त्याच्या 'ख्वाब' या गाण्याला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली. सोशल मीडियावर हे गाणं व्हायरल झालं होतं.
लॉक-अप या शोमुळे मुनव्वरला विशेष लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला होता. 70 दिवस मुनव्वर हा लॉक अप कार्यक्रमामध्ये होता.हा कार्यक्रम जिंकल्यानंतर मुनव्वरला ट्रॉफी व्यतिरिक्त, मुनव्वरला 20 लाख रुपयांचे रोख पारितोषिक, एर्टिगा गाडी आणि इटलीच्या सहलीवर जाण्याची संधी देखील मिळाली आहे.
रिपोर्टनुसार, मुनव्वर फारुकीला 'बिग बॉस ओटीटी' साठी विचारण्यात आले आहे. करण जौहरने या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन केले होते. मुनव्वर फारुकी बिग बॉससाठी एक उत्तम स्पर्धक असू शकतो, असेही चाहत्यांकडून म्हटले जात आहे. मुनव्वर विनोदवीर असण्यापासून लॉक अपचा विजेता बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास संघर्षमय होता.
संबंधित बातम्या